'बेवफा' प्रियकर सापडला नोटांच्या रांगेत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नाशिक - नोटांच्या रांगांतील खरेखोटे किस्से तुफान फिरत आहेत, यात नाशिक शहरातील सातपूरच्या बॅंकेच्या नोटांच्या रांगेत एका तरुणीला तिच्याशी प्रेमसंबंध ठेवून, नंतर फसवून रफुचक्कर झालेला मजनू चार वर्षांनी सापडला! त्यानंतर त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी बॅंकेच्या रांगेतच त्याला सर्वांसमक्ष यथासांग चोप देऊन, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले!

नोटाबंदीमुळे एका बाजूला रांगेत उभे राहून जनता कावली असताना, या तरुणीला मात्र या नोटबंदीनंतरच्या रांगेने तिचे फसवून, शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमाचा सूड उगावण्याची संधी दिली. आज दुपारी ही तरुणी त्र्यंबक रोडवरील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी रांगेत उभी होती. त्यादरम्यान, तिचे लक्ष त्याच रांगेत उभ्या असलेल्या विशाल परदेशी या पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडे गेले. तिने तातडीने मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून बोलावून घेतले. कुटुंबीयांनीही तत्काळ बॅंकेत धाव घेऊन या गाफील मजनूला रांगेतून बाहेर खेचून मनसोक्त बडवायला सुरवात केली.

अचानक झालेल्या या प्रकाराने रांगेतील नागरिकही चकीत झाले. त्यातील कुणी तरी पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या तरुणाला व त्याला मारहाण करणाऱ्या संशयीतांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्या वेळी संबधित तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी या मजनूचा प्रताप पोलिसांना सांगून त्यावर बलात्कारांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मुलीची तक्रार दाखल करून घेतली असून, तरुणाची कसून चौकशी करीत आहेत.

Web Title: cheater receive in bank line