डीलरशिपचे आमिष दाखवून 10 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नाशिक - फर्टिलायझर कंपन्यांची डीलरशिप मिळवून देण्याचे सांगत तिघांनी एकाला 10 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजय पाटील (रा. एबीबी सर्कल, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित भाऊ विनायक चौधरी, राजेंद्र चौधरी व राखी चौधरी (सर्व रा. शहादा, जि. नंदुरबार) यांनी मार्च 2012 ते ऑगस्ट 2013 दरम्यान राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर व इफ्को फर्टिलायझर या कंपन्यांची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून वेळोवेळी 10 लाख 75 रुपये उकळले. अनेक महिने उलटूनही डीलरशिप मिळत नसल्याने विचारणा केली असता, तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: cheating crime