गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नाशिक - डेअरी, हॉटेल व शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची खोटी माहिती देत दोन कंपन्यांच्या नावाखाली संचालक व कर्मचाऱ्यांनी सिडकोतील महिलेची तब्बल सुमारे 42 लाख रुपयांची, तर एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक केली.

विमल पोरजे (रा. एकतानगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजय हनवणे, सोनल अधिकारी, शेषराम ससाणे (रा. अंबिका स्वीटच्या मागे, अशोकनगर), उत्तम जाधव (रा. चुंचाळे, अंबड), संगीता उगलमुगले, शकुंतला आहिरे, भारती पगार यांनी स्वर्णभूमी रियॅलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीच्या नावाखाली डेअरी, शेती, हॉटेलमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी विमल पोरजे यांच्याकडून 2013 पासून ते आजपर्यंत ठेवी स्वरूपात 42 लाख 72 हजार रुपयांची वेळोवेळी आर्थिक गुंतवणूक करवून घेतली. मात्र संशयितांनी ही रक्‍कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून कायमचा अपहार केला.

Web Title: cheating Lure investment fraud showed millions