बोगस डॉक्‍टरांवर कारवाईसाठी प्रशासनाकडून पथकाद्वारे तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

चोपडा - शहरासह तालुक्‍यात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष याबाबतचे वृत्त "सकाळ'ने 29 मार्चला प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रशासनाने बोगस डॉक्‍टरांवर कारवाईसाठी दंडुका उगारला असून, अनेक बोगस डॉक्‍टरांचे धाबे दणाणले आहे. 

चोपडा - शहरासह तालुक्‍यात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष याबाबतचे वृत्त "सकाळ'ने 29 मार्चला प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रशासनाने बोगस डॉक्‍टरांवर कारवाईसाठी दंडुका उगारला असून, अनेक बोगस डॉक्‍टरांचे धाबे दणाणले आहे. 

शहरासह तालुक्‍यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट झाला असून ते रुग्णांवर उपचार करून अव्वाच्या सव्वा पैसे लुटत आहेत. या प्रकाराकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याने झोपेचे सोंग घेतल्याची भूमिका उठवीत असल्याचे नमूद केले होते. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे पथक तयार केले आहे. हे पथक गोपनीयरित्या बोगस डॉक्‍टरांचा शोध घेत आहे. त्यांनी आतापर्यंत चार ते पाच गावांना भेटी दिल्या आहेत. तेथील डॉक्‍टरांची तपासणी पथकामार्फत करण्यात येत आहे. डॉक्‍टरांकडून एक नमुन्यातील फॉर्म भरून तो फॉर्म व प्रशासनाचा अहवाल शासनाकडे 15 एप्रिलपर्यंत पाठविला जाणार असल्याची माहिती "सकाळ'ला प्रशासनाकडून मिळाली आहे. अखेर राज्यभर चालणाऱ्या बोगस डॉक्‍टरांची तपासणीही सुरू केल्या आहेत. यामुळे आदिवासी गावांमध्ये वाडा वस्त्यांवर विना डिग्रीवाले बोगस डॉक्‍टर राजरोसपणे प्रॅक्‍टिस करीत असल्याने ते बंद होणार आहे. आरोग्य यंत्रणेने यावर कायम स्वरूपी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. 

Web Title: Checking by the squad from the administration for action on bogus doctor