रायगडच्या समूहगीतास प्रथम पारितोषिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सारंगखेडा : चेतक महोत्सवानिमित्त झालेल्या युवा महोत्सव कार्यक्रमात हुडहुडी भरणाऱ्या थंडीत एकसे बढकर एक गीते व त्यावरील नृत्यांची अदाकारीने उपस्थितांची दाद मिळवित अनेक संघांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मात्र अंतिम फेरीत रायगड येथील जय हनुमान कलामंचचा गृपने देशभक्तीपर गीत सादर करून स्पर्धेत बाजी मारली. 

सारंगखेडा : चेतक महोत्सवानिमित्त झालेल्या युवा महोत्सव कार्यक्रमात हुडहुडी भरणाऱ्या थंडीत एकसे बढकर एक गीते व त्यावरील नृत्यांची अदाकारीने उपस्थितांची दाद मिळवित अनेक संघांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मात्र अंतिम फेरीत रायगड येथील जय हनुमान कलामंचचा गृपने देशभक्तीपर गीत सादर करून स्पर्धेत बाजी मारली. 

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्ताने चेतक महोत्सव सुरु अाहे. काल (ता. 24) रात्री युवा महोत्सव कार्यक्रम झाला. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, रायगडसह जिल्ह्यातील एकुण 20 समुह नृत्यांचा गटांनी सहभाग नोंदवला होता. चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपाल रावल यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर पगार, सहायक पोलिस निरीक्षक श्री. बडगुजर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य; दिलीप शिर्के, आर. बी. राजपूत, प्रमोद जोशी, शरद शिरसाठ उपस्थित होते. 

श्री. गणेशा देवा या प्रसिद्ध वंदन गीतावर दिलखेचक नृत्य सादर करुन युवा महोत्सवाचा शुभारंभ झाला. या गीताला प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजराने साथ देऊन महोत्सावचा उत्साह द्विगुणित केला. औरंगाबाद येथील समुहाने लल्लाटी भंडारा या जोगव्यावरील नृत्याने उपस्थित सर्वांना डोलायला लावले. त्यानंतर रायगड येथील जयहनुमान कलामंचाातील समुहाने देशभक्तीपर गीतांवर नृत्य करुन डोळ्यांचे पारणेही फेडले व साऱ्या उपस्थितांमध्ये देशभक्ती जागृत केली. त्यांनी सादर या गीतावरील दिलखेचक नृत्याने साऱ्यांची मने हेलावून सोडली. त्यांचा या गृपला परिक्षकांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर करून देशभक्तीला न्याय दिला. विजेते संघ असे ः जय हनुमान कलामंच (रायगड) - प्रथम (71, हजार रुपये), येंजल गृप (पुणे) - द्वितीय (51 हजार रुपये), दिलखेच गृप (नालासोपारा) - तृतीय (31 हजार रुपये), व्हीयाॅन गृप - उत्तेजनार्थ (31 हजार रुपये).

स्पर्धेचे परिक्षक म्हणून मदन सोनवणे यांनी काम पाहिले. विवेक पाटील, अजय पाटील, पुरुषोत्तम आगळे यांनी महोत्सवाचे संयोजन केले.

Web Title: chetak youth festival