esakal | प्रतीक्षा मंत्रिपदाची... भुजबळ, भुसे यांची नावे आघाडीवर 
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal and bhuse.jpg

भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे नाव निश्‍चित समजले जात आहे.  भुसे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य वाढले आहे. तालुक्‍यात शिवसेनेचा पाया भक्कम करण्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांवरही वर्चस्व निर्माण करण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

प्रतीक्षा मंत्रिपदाची... भुजबळ, भुसे यांची नावे आघाडीवर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा व मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी (ता. 28) मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातून प्रामुख्याने माजी मंत्री छगन भुजबळ व मालेगाव बाह्यचे दादा भुसे यांची नावे आघाडीवर आहेत. दोघे ज्येष्ठ असून, सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. तालुक्‍यातील मतदारांना श्री. भुसे यांना हमखास मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. 

आघाडीचा पॅटर्न येथील महापालिकेत अडीच वर्षांपासून कायम 
भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांना कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे नाव निश्‍चित समजले जात आहे.  भुसे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य वाढले आहे. तालुक्‍यात शिवसेनेचा पाया भक्कम करण्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांवरही वर्चस्व निर्माण करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. मालेगावसारख्या मुस्लिमबहुल शहरात शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपद मिळवून देण्यात श्री. भुसे यांचा सिंहाचा वाटा होता. राज्यातील आघाडीचा पॅटर्न येथील महापालिकेत कॉंग्रेस व शिवसेनेच्या युतीने अडीच वर्षांपासून कायम ठेवला आहे. श्री. भुसे "मातोश्री'च्या विश्‍वासातील आहेत. श्री. भुजबळ यांच्याशी त्यांची जवळीक व सलोखा विरोधी पक्षात असतानाही सर्वश्रुत आहे. 

हेही वाचा >थरारक अपघात....गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता

की पुन्हा राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागणार..
येथील प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आगामी काळात भुसे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते, असे जाहीरपणे सांगितले होते. काही वर्षांत तब्बल तीन वेळा आदित्य ठाकरे मालेगाव दौऱ्यावर येऊन गेले. भुसे यांचा येथील प्रभाव व कामाविषयी ते स्वत: व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही प्रभावित झाले आहेत. शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशीही भुसे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवावयाचे असल्यास  भुसे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी लागेल, अशी धारणा सामान्य कार्यकर्त्यांत आहे. विधान परिषदेचे नरेंद्र दराडे यांनीही मंत्रिपदासाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेच्या पहिल्याच बैठकीत विधान परिषदेच्या सदस्यांऐवजी विधानसभेवर निवडून आलेल्यांना संधी द्या, अशी एकमुखी मागणी केली आहे. यामुळे शिवसेनेतील विधान परिषदेवरील काही ज्येष्ठ मातब्बर वगळता विधान परिषदेतील नवीन किती आमदारांना संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. भुसे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार की पुन्हा राज्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागणार याविषयीही चर्चा सुरू आहेत. 

हेही वाचा >जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 

loading image
go to top