मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण करू नये - सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नंदुरबार - मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात, हे दुर्दैव आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हे वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांनी अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे दिला. 

येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. ५) भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हातात आहेत, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्या म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पन्नास वर्षे राजकारण केले. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधी केले नाही. मुख्यमंत्री अशी सुडाची भाषा वापरत असतील, तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. 

कोपर्डी येथील घटनेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यांनी एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करू, अशी घोषणा केली होती. मात्र ११ तारखेला त्या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. अद्यापही आरोपपत्र दाखल केले गेले नाही. नैतिक अधिकार म्हणून आपण त्या मुद्यावर लक्ष 
केंद्रित केले आहे., असे त्या म्हणाल्या.

Web Title: The Chief Minister should not politics by supriya sule