चिकू वाचले, पण पक्ष्यांचे प्राण गेले

प्रमोद पाटील
बुधवार, 9 मे 2018

चिचोंडी - वेळ सकाळची. अंदाजे साडेदहा वाजेलेले. ठिकाण- नांदगाव येथील गुप्ता मंगल कार्यालय. या ठिकाणी चिकूची दोन मोठी झाडे पाहताक्षणी मनात भरतात. मात्र, नीट निरीक्षण करताच झाडावर टाकलेली नेट (जाळी) व त्यात अडकून गतप्राण झालेले असंख्य निष्पाप पक्षी पाहून कोणाच्याही मनाला असंख्य वेदना होतात. एकीकडे चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण पक्ष्यांना वाचविण्यासाठी पुढे येत असताना, केवळ चिकू वाचविण्यासाठी झाडाला भलीमोठी नेट लावून लॉन्सच्या संचालकाच्या कृतीने केवळ पक्षीप्रेमीच नव्हे, तर वऱ्हाडीही आपल्यासोबत दुःखाच्या वेदना घेऊन जाताहेत; परंतु याचे लॉन्समालकाला काहीही सोयरसुतक नाही. 

नांदगावला गुप्ता लॉन्सच्या परिसरात चिकूची दोन बहारदार झाडे आहेत. संचालक राजीव गुप्ता यांनी पक्ष्यांनी चिकू खाऊ नयेत यासाठी झाडालाच जाळी (नेट) लावण्याची शक्कल लढविली. मात्र, या जाळीने झाडाच्या सावलीत बसण्यासाठी येणारे असंख्य पक्षी त्यात अडकून गतप्राण झाले आहेत. जाळीत अडकलेले पक्षी सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने साद घालत असतानाही गुप्ता महाशयांना जरासाही पाझर फुटत नसल्याने निष्पाप चिमणी, ससाणा, कोतवाल, काळी बुलबुल, वटवाघूळ, साळुंकी यांसारख्या असंख्य पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. एकीकडे जितके चिकू तितक्‍याच संख्येने जाळीत अडकून अन्नपाण्यावाचून तडफडून मेलेले पक्षी दिसत आहेत. 

विवाहानिमित्त सोमवारी (ता. ७) कल्याणहून आलेल्या काही पक्षीप्रेमींना या झाडातील जाळीत काळा शराटी पक्षी तडफडताना दिसला. शिडीआधारे कल्याणच्या लावेश पाटील, मनोज धुमाळ, हर्षद राऊत, आकाश पाटील, विकास राऊत, केदार अधिकारी या पक्षीप्रेमींनी वर जात पक्ष्याची सुटका करत जीवदान दिले. झाडाभोवती लावलेली जाळी काढून टाकण्याची विनंती त्यांनी लॉन्समालक राजीव गुप्ता यांच्याकडे केली.

मागील काही महिन्यांत वटवाघूळ रात्रीच्या वेळी येत. चिक्कू फस्त करत असल्याने फळांच्या रक्षणासाठी जाळी लावली होती. पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय बागेत करतो. ही जाळी लवकरच काढणार आहे.  
- राजीव गुप्ता, नांदगाव

विवाहासाठी आम्ही कल्याणहून येथे आलो. हिरव्यागार झाडाखाली उभे असताना सहज वर नजर गेली असता, जाळीमध्ये अडकलेला पक्षी सुटकेसाठी तडफडताना दिसला. जाळीत अनेक पक्षी अडकून मृत स्थितीत लटकलेले आहेत. आम्ही त्या जिवंत पक्ष्याला जाळीतून सोडत मुक्त केले. 
- लावेश पाटील, कल्याण

Web Title: chikoo bird death in net

टॅग्स