बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेसह तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सिन्नर - तालुक्‍यातील भोकणी व खंबाळे शिवारातील मऱ्हळ रस्त्यावर मंगळवारी बिबट्याने एका बालिकेसह दोघांवर हल्ला केला.

सिन्नर - तालुक्‍यातील भोकणी व खंबाळे शिवारातील मऱ्हळ रस्त्यावर मंगळवारी बिबट्याने एका बालिकेसह दोघांवर हल्ला केला.

या हल्ल्यात दयाराम मोतीराम नवले (वय 40, चिंचोलीतांडा, ता. नांदगाव), भाऊसाहेब पोपट डावखर (वय 55) व कोमल सोमनाथ डावखर (वय 6, भोकणी, ता. सिन्नर) हे जखमी झाले. जखमींवर दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बिबट्याचा हल्ला होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्या खंबाळे परिसरात असलेल्या शेतातील वैरणीच्या गंजीत लपला असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्या लपलेल्या ठिकाणी पिंजरा लावला.

Web Title: child & three people injured in leopard attack