Positive News : आईच्या स्मृती जपण्यासाठी अस्थींसह वृक्षारोपण; मोरे परिवाराचा आदर्श उपक्रम

Family planting oxygen-giving trees with mother's bones.
Family planting oxygen-giving trees with mother's bones.esakal

पिंपळनेर (जि. धुळे) : सत्यशोधक विचाराने प्रेरित होऊन आमखेल (ता. साक्री) येथे चंद्रभागाबाई मोरे यांच्या पंचक्रिया विधीस मराठी (Marathi) शाळेच्या प्रांगणात मुलांनी आईच्या अस्थींसह ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण केले. (children planted oxygen giving trees with their mother bones dhule news)

भाच्याने साने गुरुजींचे श्यामची आई व भगवत गीता संच भेट देत, जिल्हा परिषद शाळेला २५ हजार रुपये देऊन समाजात एक सत्यशोधक आदर्श उपक्रम केला. आमखेल येथील चंद्रभागाबाई माधवराव मोरे (वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांचा पंचक्रिया विधी करताना सत्यशोधक विचाराने प्रेरित होऊन मुले प्रगतिशील शेतकरी रमेश मोरे, दंगल मोरे, रवींद्र मोरे, सुना अरुणाबाई मोरे, कमलबाई मोरे, रोहिणी मोरे, नाती भावना गांगुर्डे, उज्ज्वला पाटील व भावना सोनवणे, आरती ठाकरे यांनी आईच्या पंचक्रियेदिनी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड, व कडुलिंबाची झाडे आपल्या कुटुंब व परिवारासह उपस्थित राहून वृक्षारोपण करून समाजात आदर्श निर्माण केला.

याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ गावात वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचा समतोल राखून गावात ऑक्सिजनची मात्रा वाढेल तसेच कडक उन्हापासून फायदा होऊन सावली मिळून शकते. गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्यास पक्षांनादेखील निवारा व फळांपासून अन्न मिळण्यास मदत होईल.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Family planting oxygen-giving trees with mother's bones.
Holi 2023 : होळीसाठी शेणाच्या चाकोल्या झाल्या इतिहासजमा

त्यांना त्यांची मुलगी कल्पना देवरे व जावई प्रकाश देवरे, तसेच काका पोपट देवचंद मोरे, विश्वास देवचंद मोरे, जगन्नाथ ओंकार मोरे, नानासाहेब मोरे, मुरलीधर धोंडू, मोरे, महेंद्र मोरे, योगेश्वर मोरे, राजेंद्र गांगुर्डे, सुरेश मराठे, त्र्यंबक सोनवणे, गोटू ठाकरे, धर्मराज सोनवणे, महेश गांगुर्डे, विशाल गांगुर्डे, दीपक पाटील, सचिन देसले यांनी या उत्तम उपक्रमाचे कौतुक केले.

या ठिकाणी वृक्षारोपण केले. झाडांचे मातृछाया म्हणून नामकरण करण्यात आले. या वेळी मोरे परिवाराच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सुभाष जगताप, पिंपळनेर सुरेंद्रराव मराठे, प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी कौतुक केले असून, आमखेल गावासह तालुक्यातून उपक्रमाचे अभिनंदन केले जात आहे.

भाच्याचेही दातृत्व

या पंचक्रिया विधी कार्यक्रमात चंद्रभागाबाई मोरे यांचे भाचे गोविंदराव बारकू ठाकरे यांनी मामींच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी शाळेला २५ हजार रुपयांचा धनादेश फिक्स डिपॉझिट केला व येणाऱ्या व्याजातून दर वर्षी येणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस जाहीर करून शाळेला साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकांचा संच व भगवद्‍गीतेचा संच भेट दिला. पंचवीस हजारांचा धनादेश व पुस्तकांचा संच आमखेलचे सरपंच ज्ञानेश्वर पवार व शिक्षक श्यामकुमार बेडसे यांच्याकडे सुपूर्द केला.

Family planting oxygen-giving trees with mother's bones.
Dhule News : वादळाचा केळीसह हरभऱ्याला फटका; हिंगोणी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com