Dhule News : वादळाचा केळीसह हरभऱ्याला फटका; हिंगोणी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

Damaged trees in Kundan Patil's cardamom and banana plantation due to storm.
Damaged trees in Kundan Patil's cardamom and banana plantation due to storm.esakal

शिरपूर (जि. धुळे) : तालुक्यात शनिवारी (ता. ४) सायंकाळी वादळ आणि पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. पूर्ण वाढ झालेली केळीची (Banana) झाडे मोडून पडली, तर पाने फाटल्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नात घट होण्यात होणार आहे. (Storm and unseasonal rain hits gram along with banana causing loss to farmers in Hingoli dhule news)

हरभरा आणि गव्हालाही या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी साडेसातला जोरदार वादळ झाले. जमिनीवरील सटरफटर वस्तू, झाडांचा पालापाचोळा वावटळीमुळे हवेत उंचावर उडून गेला.

धुळीने आसमंत भरून गेल्यानंतर वीज गडप झाल्याने अंधारात काहीच दिसेनासे झाले. सुमारे १५ मिनिटे टिकलेल्या वादळाने केळीच्या बागा मोडून पडल्या. केळीचे लोंगर भुईसपाट झाले. पाने फाटल्यामुळे झाडांचे मोठे नुकसान झाले.

तालुक्यातील हिंगोणी गावात युवा शेतकरी कुंदन भीमराव पाटील यांनी दक्षिण भारतातील वेलची हे केळीचे वाण लावले असून, त्यांना विक्रमी चार हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Damaged trees in Kundan Patil's cardamom and banana plantation due to storm.
Dhule Rain : भडणे, तावखेडासह कापडणे परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान

त्यांच्या बागेतील सुमारे तीनशे झाडे मोडून पडली आहेत. त्यासोबतच अर्थे, बभळाज, पिंप्री परिसरातही केळीचे नुकसान झाले. पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हरभऱ्यालाही फटका

तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्रही लक्षणीय आहे. सुमारे ५० टक्के हरभऱ्याची काढणी झाली आहे. शिल्लक हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. पाऊस झाल्याने हरभऱ्याची प्रतवारी खालावणार असून, त्याचा परिणाम भाव पडण्यात होणार आहे.

गव्हाची काढणीही बव्हंशी पूर्ण झाली असून, जो गहू शेतात शिल्लक होता, त्याला फटका बसला आहे. वादळानंतर बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तो पहाटे सुरळीत झाला. काही ठिकाणी कमकुवत झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.

Damaged trees in Kundan Patil's cardamom and banana plantation due to storm.
Nashik News : विमा कंपनीच्या नावाखाली दाखविले आमिष; ज्येष्ठ नागरिकाला 95 हजारांचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com