Dhule Crime News : दोंडाईचा येथे मिरची व्यापाऱ्यावर हल्ला; एक संशयित ताब्यात

Gavathi katta and live cartridges were seized from the suspect who attacked the chilli trader.
Gavathi katta and live cartridges were seized from the suspect who attacked the chilli trader. esakal

Dhule Crime News : येथे गुजरात येथील मिरची व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून चाकूने व्यापाऱ्यावर वार केला.

त्यातील एका संशयितास ताब्यात घेत बेकायदेशीररीत्या गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे दोंडाईचा पोलिसांनी हस्तगत केली. (Chilli trader attacked at Dondaicha Dhule Crime News)

रविवारी (ता. २३) रात्री आठच्या सुमारास मेहुल पंकजभाई मेसुरिया (वय २८, रा. विरामनगर, सुरत, गुजरात) या मिरची व्यापाराला येथील नंदुरबार चौफुलीजवळील उड्डाणपुलाखाली तीन जणांनी संगनमत, कटकारस्थान करून घेरले. पैसे वसूल करणे आणि पैसे न दिल्याने ठार करण्याची धमकी दिली.

त्यांच्या जवळील गावठी कट्टा काढून धमाकावले. त्यात व्यापाऱ्याने पळ काढला. त्या वेळी एकाने चाकूने वार केला. त्यामुळे व्यापाऱ्याच्या हाताला जखम झाली. पोलिस ठाण्यात मिरची व्यापारी मेसुरिया यांनी अभिषेक गोस्वामी (रा. वेस रोड, सुरत-नवसारी), समाधान राजपूत (रा. दोंडाईचा), सिद्धार्थ थोरात (रा. नवसारी, गुजरात) या तीन जणांच्या विरोधात फिर्याद दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gavathi katta and live cartridges were seized from the suspect who attacked the chilli trader.
Dhule Crime News : धुळे हादरले! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक नेमण्यात आले.

पोलिस कर्मचारी राजन दुसाणे, पुरुषोत्तम पवार, अनिल धनगर, प्रवीण निकुंभे यांच्या पथकाने तीन संशयितांपैकी समाधान ऊर्फ अधिकार आनंदसिग राजपूत (२७ रा. वाडी-शेवाडे ह.मु.परसामळ, ता. शिंदखेडा) या संशयितास ताब्यात घेतले.

त्याने गुन्हात वापरलेला गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम पवार करीत आहे.

Gavathi katta and live cartridges were seized from the suspect who attacked the chilli trader.
Dhule Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चौकशीचा आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com