बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट 

भूषण श्रीखंडे
बुधवार, 20 मार्च 2019

बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट 

बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट 

जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर आहे. कृत्रिम घरटी, घरावर धान्य, अन्न, पाणी ठेवूनही या घटत्या चिमण्यांची संख्या वाढीस लागू शकते. महाराष्ट्रात केवळ घर चिमणी (हाऊस स्पॅरो) हा एकमेव चिमणीचा प्रकार आढळतो. 
सन 2000 पासून चिमण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. 60 टक्के चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. आहे त्या चिमण्यांना पोषक वातावरण, अन्न, पाणी मिळते त्या वातावरणात राहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चिमण्या वाचविण्यासाठी जळगावमधील पक्षीप्रेमींकडून नागरिकांना घराच्या परिसरातील बाग, झाडे तसेच गच्चीवर पक्ष्यांना अन्न, पाणी सोबत कृत्रिम घरटी ठेवल्यास या पक्ष्यांची संख्या वाढणे शक्‍य आहे. 

22 ग्रीडमध्ये एक हजार 237 चिमण्या 
जागतिक चिमणी दिनानिमित्त जळगावात आठ भागांत चिमणी गणना केली. या उपक्रमात गोकुळ इंगळे, हर्षल पाटील, अलका पाटील, योगेश सोनार, मुक्ताबाई सोनार, विलास बरडे, प्रा. सुजाता देशपांडे, किशोर पाटील, निखिल घोलप, आवेश शेख शकील यांनी सहभाग नोंदविला. 

चिमण्यांची संख्या जरी कमी असली, तरी त्या नष्ट झालेल्या नाहीत. माणसाची जीवनशैली बदलल्याने त्यांना अन्न, पाणी मिळत नसल्याने ते शहरी भागात दिसत नाहीत. जिल्ह्यासह सर्वच ग्रामीण भागात चिमण्यांचे प्रमाण बऱ्यापैकी दिसते. शहरी भागात उपाययोजना केल्यास नक्कीच त्यांचे प्रमाण वाढेल. 
- उभय उजागरे, पक्षीमित्र 
... 
अशी आहे चिण्यांची नोंद 
ठिकाण चिमण्यांची संख्या 
शिवाजीनगर.............80 
ममुराबाद रोड.............65 
कानळदा रोड.............70 
निमखेडी रोड.............68 
चंदूअण्णानगर............10 
हनुमानखोरे..............32 
सावखेडा रोड..............105 
शिरसोली रोड.............45 
मेहरूण तलाव...............32 
मन्यारखेडे तलाव............52 
लांडोरखोरे..................27 
डॉ. श्‍यामा मुखर्जी उद्यान......00 
पिंप्राळा रोड..................65 
कचरा खत कारखाना........42 
वाघुळदेनगर................150 
म्हाडा कॉलनी............. 200 
शिवशक्तीनगर..............20 
लक्ष्मीनगर....................35 
श्रीनगर......................4 
श्‍यामनगर......................17 
गोलाणी मार्केट तळघर........28 
मोगल पार्क.....................10 

Web Title: chimnyat sankhet ghat