Accident
sakal
चिमठाणे: खलाणे (ता. शिंदखेडा) येथील पिक-अप शेडमध्ये एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर बसस्थानकात शिरले. त्यामुळे एक महिला जागीच ठार झाली, तर एक ज्येष्ठ मजूर आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना बुधवारी (ता. १५) सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी घडली. डंपरचालकाविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.