हुतात्मा जवानावर आज अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

चिमठाणे - जम्मू-काश्‍मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले खलाणे (ता. शिंदखेडा) येथील लान्स नायक योगेश मुरलीधर भदाणे (वय 28) यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 15) दुपारी एकला खलाणे येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जम्मू येथील लष्कराच्या तळावरून उद्या सकाळी साडेअकरापर्यंत लष्कराच्या विमानाने जवान योगेश यांचे पार्थिव ओझर (जि. नाशिक) येथे आणण्यात येईल. तेथून दुपारी सव्वाबारापर्यंत हेलिकॉप्टरने खलाणे येथे आणले जाईल. अंत्यदर्शनानंतर दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार होतील. योगेश यांच्या पत्नी प्रिया यांच्यासोबत महिला मेजर, आर्मीचे दोन अधिकारी व धुळे जिल्ह्यातील एक जवान असतील.

Web Title: chimthane news The funeral of martyr Jawan is today