Nandurbar News : गंभीर आजार प्रार्थनेने बरा होत असल्याच्या दावा; नागरिकांकडून धर्मांतराचा आरोप

Confusion caused by villagers' allegations that people were being converted by gathering people in a house
Confusion caused by villagers' allegations that people were being converted by gathering people in a house esakal

Nandurbar News : लोणखेडा येथील कृष्णानगरात गेल्या तीन चार वर्षापासून प्रकाश साळुंखे व सुरेश साळुंखे यांच्या घरात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ सुरू असून तेथे बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीतआज ग्रामस्थांनी घेराव घातला. (citizens are told that serious illnesses can be cured by prayer alone nandurbar news)

या ठिकाणी धडगाव परिसरातून भोळ्याभाबड्या नागरिकांना आणत त्यांना केवळ प्रार्थनेने गंभीर आजार बरा होत असल्याचे सांगण्यात येत असल्याने या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.

पोलिसांनी नागरिकांची समजूत घालत संबंधितांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेल्यानंतर तणाव निवळला. मात्र या प्रकाराचा छडा लावला गेलाच पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित ठिकाणी आज सकाळी दहाला परिसरातील ग्रामस्थांनी जमून घेराव घातला. या घरात प्रार्थनास्थळाच्या नावाने नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय व्यक्त करत विविध हिंदुत्ववादी संघटना व लोणखेडा ग्रामस्थांनी धाव घेतली. घरात त्यावेळी 60 ते 70 स्त्री व पुरुष एका हॉलमध्ये आढळले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Confusion caused by villagers' allegations that people were being converted by gathering people in a house
Dhule News : कुंभार समाजाला मातीची रॉयल्टी माफ; संजय गाते यांची माहिती

त्यांना विचारणा केली असता आम्ही येथे प्रार्थना करायला येत असून येथे आल्यानंतर येशू ख्रिस्तांचे नामस्मरण केल्यानंतर आमचे आजार बरे होतील असे सांगण्यात आले. यावेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक व गोंधळ झाल्याने शहादा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले.

प्रार्थनास्थळ चालवणाऱ्या व तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचे आधारकार्ड, नाव, गाव चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशी दरम्यान जमलेल्यांमध्ये शहादा व धडगाव तालुक्यातील स्त्री पुरुषांचा समावेश होता. मोठमोठे आजार विना औषधोपचाराने व कोणतीही वैद्यकीय तपासणी व उपचार न घेता बरे होत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत असल्याने या दाव्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा दखल घ्यावी असे नागरिकांनी सांगितले.

शहादा पोलिस तसेच लोणखेडा येथील पोलिस पाटील युवराज पाटील, गणेश राजे पाटील यांचा मध्यस्थीने तेथे जमलेल्या नागरिकांना शांत करण्यात आले. प्रार्थनास्थळ चालवत असलेल्या चार ते पाच लोकांना शहादा पोलिस ठाण्यात चौकशीकरिता बोलविण्यात आले.

Confusion caused by villagers' allegations that people were being converted by gathering people in a house
Unseasonal Rain : अतिवृष्टी भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा

भोळ्याभाबड्या, गरीब लोकांना विविध प्रकारचे आमिष देऊन धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास आपणावर गुन्हे दाखल होतील अशी तंबी देण्यात आली. प्रार्थनास्थळ चालवणाऱ्या व्यक्तींकडून आम्ही कोणतेही धर्मांतर करत नसून आम्ही फक्त प्रार्थना करण्यासाठी येथे जमलेले आहोत असे सांगण्यात आले.

ग्रामस्थांकडून निवेदन

लोणखेडा, कृष्णानगर परिसरातील ग्रामस्थांकडून शहादा पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शहादा व धडगाव तालुक्यातील गरीब जनतेला विशेष करून स्त्रियांना तुमचे आजार बरे होतील असे सांगून प्रार्थनास्थळात बोलून धर्मांतराचा प्रयत्न होत असून सतर प्रकार हा धार्मिक द्वेष निर्माण करणारा, अंधश्रद्धा पसरवणारा असून याबाबत पोलिस प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात यावी. निवेदनावर लोणखेडा गावातील 60-70 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणतीही परवानगी नाही

संबंधित प्रार्थनास्थळाची कोणतीही परवानगी प्रार्थनास्थळ चालवणाऱ्या व्यक्तींकडे नव्हती किंवा साऊंड सिस्टीम लावून प्रार्थना करण्याची ही परवानगी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आलेली नसल्याचे यावेळी आढळून आले, त्यामुळे ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

"कोणत्याही देवाचे, धर्माचे नामस्मरण करण्यासाठी मनाई नाही, परंतु बाहेरगावाहून अशिक्षित, भोळ्या, गरीब लोकांना गोळा करून गावात धार्मिक द्वेष किंवा तेढ निर्माण होईल असे कृत्य कुणीही करू नये. आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल." - युवराज पाटील, पोलिस पाटील, लोणखेडा.

Confusion caused by villagers' allegations that people were being converted by gathering people in a house
Dhule News : उत्पादन कमी असतानाच ‘दुधाचा महापूर’ कसा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com