नागरीकांनी सोडल्या खड्ड्याच्या पाण्यात कागदी बोटी

सकाळ वृतसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

येवला : येवला शहराच्या अंतर्गत भागात आणि नववसाहतीमध्ये रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यात भर म्हणून पाण्याचे वाल्व गळतीमुळे शहरात रस्त्यावर मध्यभागी खड्डे निर्माण झाले आहेत.

नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही रस्त्यातील खड्डे बुजवण्याची थातूरमातूर प्रक्रिया केली जाते. शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या काळा मारुती रस्त्यावरील पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये गेले कित्येक दिवसांपासून पाणी साठले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला संबंधित वाल्व दुरूस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

मात्र महिन्याभरात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या ठिकाणी असलेल्या खड्ड्यातील पाण्यात कागदी होड्या सोडून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे राहुल लोणारी,धिरज परदेशी,संजय गोंधळी,विजय गोंधळी,नंदू भावसार, मोहन जाधव, संजय आहेर, बाळू मोरे ,पंकज कायस्थ आदींसह नागरिक उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens protest by letting paper boats in pit water