ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी शाह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नाशिक - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी आज ऍड. नारायणभाई शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्राहक पंचायतीचा मुख्य अजेंडा यापुढे "शेतकरी ते थेट ग्राहक' हे नाते अधिक दृढ करण्याचाच राहील, असा विश्‍वास शाह यांनी या वेळी व्यक्त केला.

ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वार्षिक सभा आज नाशिकमध्ये झाली. त्या वेळी शाह यांनी मावळते अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात झालेल्या सभेस सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी विविध ठराव मंजूर करून त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचेही ठरविण्यात आले.

Web Title: Client Panchayat chairman narayanbhai shah