Dhule News : केंद्राच्या CTET परीक्षेनंतरच TAIT परीक्षा; बेरोजगारांना संधी

exam
examesakal

कापडणे (जि. धुळे) : राज्यात कधी नव्हे ती सर्वांत मोठी मेगा शिक्षकभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक अभियोग्यता चाचणीचे (टीएआयटी ) नोटीफिकेशन (Notification) ३१ जानेवारीला जाहीर केले.

२२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ही परीक्षा सर्व जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) किंवा केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. (CM Eknath Shinde approached by unemployed in state demand was accepted TAIT exam only after center CTET exam Dhule news)

मात्र केंद्राची सीटीईटी परीक्षाही याच कालावधीत होत आहे. या परीक्षेनंतरच टीएआयटी घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील बेरोजगारांनी केली होती. ही मागणी मान्य झाली असून, बेरोजगारांना मोठी संधी प्राप्त झाली आहे.

पात्र बेरोजगारांनी दिलेले निवेदनाचा आशय : केंद्र सरकारमार्फत २७ डिसेंबर २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपूर्ण देशभरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार आहे. ही परीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे.

परीक्षा संपल्यानंतर लवकरच तिचा निकालही जाहीर होण्याची शक्यता आहे; परंतु या प्रक्रियेतच राज्यामार्फत शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे आयोजन झाल्यामुळे केंद्रीय सीटीईटी परीक्षेतील संभावित पात्र परीक्षार्थींना राज्याच्या शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेस मुकावे लागणार आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

exam
Contaminated Water : ...अन्यथा अधिकाऱ्यांनाच दूषित पाणी पाजू; जुने धुळ्यातील रहिवाशांचा इशारा

टीएआयटी परीक्षेस केंद्रीय सीटीईटी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरण्याची मुभा दिल्यास पात्रताधारक शिक्षक मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. मात्र राज्याकडून टीएआयटी परीक्षेचे आयोजन आकस्मात झाल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रांचा झाला विचार

केंद्र सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) प्रविष्ट झाले आहेत. अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल टीएआयटी २०२२ परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच ८ फेब्रुवारीनंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन टीएआयटी २०२२ परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून टीएआयटीसाठी अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षे (टीएआयटी)साठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे (उदाहरणार्थ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र) इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन त्यांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी पत्रकान्वये दिली.

exam
Nashik Fraud Crime : Franchiseच्या नावाने साडेसात लाखांची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com