मुख्यमंत्री पेयजल योजनेतून  पास्ते गावाची योजना रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत पास्तेचा समावेश केल्याने पास्तेच्या योजनेबाबत प्रश्‍नचिन्ह तयार झाले. 

नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत पास्तेचा समावेश केल्याने पास्तेच्या योजनेबाबत प्रश्‍नचिन्ह तयार झाले. 

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एक हजार तीन नळपाणी पुरवठा योजना नव्याने राबविण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमातून 262 कोटी 63 लाखांच्या 119 योजना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. काही योजना अव्यवहार्य असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील 6, ठाणे 2, पुणे 4, सातारा 10, सांगली 2, सोलापूर 4, कोल्हापूर 2, नाशिक 14, धुळे 2, नंदुरबार 2, जळगाव 7, नगर 4, औरंगाबाद 2, जालना 5, नांदेड 3, उस्मानाबाद 4, बीड 3, लातूर 5, अमरावती 6, अकोला 5, वाशिम 6, बुलडाणा 2, नागपूर 5, वर्धा आणि भंडारामधील प्रत्येकी एक, चंद्रपूर दोन आणि गडचिरोलीमधील नऊ योजना वगळण्यात आल्या. 

राष्ट्रीय पेयजलमध्ये काम  
पाणीपुरवठा विभागाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील 9, नाशिक 7, जालना 4, सांगली आणि नागपूरमधील एक योजना मंजूर झाली आहे. मंजूर योजनेचा प्रस्तावित खर्च रुपयांत असा ः नवे निरपूर (ता. बागलाण)- 56 लाख 87 हजार, पिंप्राळे (ता. नांदगाव)- 90 लाख 72 हजार, मानोरी (ता. सिन्नर)- 34 लाख 44 हजार, एकलहरे (ता. कळवण)- 58 लाख 20 हजार, पास्ते- 70 लाख 46 हजार, ब्राह्मणगाव (ता. बागलाण)- एक कोटी 88 लाख, आडवाडी (ता. सिन्नर)- एक कोटी 23 लाख. शिवाय ब्राह्मणपाडे (ता. बागलाण), चिंचवे निंबायती (ता. देवळा), वीरशेत (ता. कळवण), पिंपळद (ता. नाशिक), राजूरबहुला (ता. नाशिक), सारूळ (ता. नाशिक), वाढोली (ता. त्र्यंबकेश्‍वर), नागडे (ता. येवला) या नळपाणी पुरवठा योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मंजूर असल्याने मुख्यमंत्री पेयजलमधून वगळण्याची शिफारस करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनेगाव आणि वीस गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केल्याने धारणगाव, दापूर आणि आठ वाड्या, फर्दापूरची स्वतंत्र योजना रद्द करण्यात आली. लोकसंख्या एक हजारापेक्षा कमी असल्याने आळीवपाडा, प्रतापगड, सूर्यगड (ता. सुरगाणा) या तीन गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजलच्या 2017-18 च्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आला. 

196 कोटींच्या 25 योजना 
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात नव्याने 196 कोटी 92 लाखांच्या 25 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात जालना जिल्ह्यातील 95, परभणीमधील 65 गावांबरोबर बीड, जालना, औरंगाबाद, लातूरमधील प्रत्येकी एक, कोल्हापूर- 16, सांगलीमधील पाच गावांचा समावेश आहे. 

Web Title: CM Rural Drinking Water nashik news