Dhule News : 25 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; जिल्हाधिकारी शर्मा यांचा आदेश

water canal
water canalEsakal

Dhule News : वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाण्याचे अवर्तन सोडण्याचा आदेश शुक्रवारी (ता. १९) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाटबंधारे विभागाला दिला.

या आवर्तनामुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (Collector ordered Irrigation Department to release 190 736 million cubic feet of water from left right canals from Madhyam Project dhule news)

वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी अवर्तन सोडण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, ज्येष्ठ नेते डी. आर. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिह गिरासे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ दीपक बोरसे यांनी जिल्हाधिकारी जयश शर्मा यांच्याकडे केली होती.

त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील गावांसाठी पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाणी तालुक्यातील २५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. डाव्या कालव्यावरील २१ गावांसाठी १४५.३७ व उजव्या कालव्यावरील चार गावांसाठी ४५.३६ दशलक्ष घनफूट पाणी एकाच आवर्तनात सोडण्यात येणार आहे.

अटी व शर्तींचे काटेकोर पालन करा!

जिल्हाधिकारी शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे, की आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढल्याबाबत व पुन्हा टाकून पाणी अडविले जाणार नाही. याबाबत धुळे पाटबंधारे विभागाने संनियंत्रण करावे, तसेच पाणी अडविले किंवा अनधिकृत उपसा होणार नाही याबाबत आपल्या आधिपत्याखालील अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water canal
Nandurbar Police : तळोदा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक; वाहन अपघातातील गुन्हेगाराला शोधल्याची पावती

याबाबतचे संनियंत्रण शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांनी करावे. आवश्यक असल्यास पाणी सोडण्यापूर्वीच पोलिस बंदोबस्ताची मागणी करून परिपूर्ण नियोजन करावे.

पोलिस अधीक्षकांनी पाणी सोडल्यानंतर नागरिकांकडून पाणी अडविणे, चोरी/कॅनॉल फोडणे, वीजपंपाद्वारे पाणीगळती करणे यांसारखे अनुचित प्रकार न होण्यासाठी गरज असल्यास पोलिस बंदोबस्त देणे, पोलिस गस्ती वाहनाने वेळोवेळी भेटी देणे, याबाबत मदत करण्यासाठी अधीनस्त पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना आदेशित करावे.

पाणी तालुक्यातील गावांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता, पोलिस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व तलाठी/ग्रामसेवक यांची संयुक्तीकरीत्या राहील. पाणीपट्टीची रक्कम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाटबंधारे विभागास जमा करून घेऊन त्यानंतरच पाणी आवर्तन सोडण्याची कार्यवाही करावी.

water canal
Veer Savarkar Smarak : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी शाहांकडून 20 लाखांचा निधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com