कोलंबोत पोचली मराठी ग्रंथसंपदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नाशिक ः "ग्रंथ तुमच्या दारी' चळवळ ही अक्षर नात्याबरोबरच मराठी संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे काम करत आहे. त्यातून समृद्ध मनाची साखळी तयार होत आहे. साहित्याचा अर्थच मानवी मूल्यांची जोपासना आहे, असे प्रतिपादन विश्‍वास ग्रुपचे प्रमुख विश्‍वास ठाकूर यांनी केले. 

विनायक रानडे प्रणीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या "ग्रंथ तुमच्या दारी' उपक्रमांतर्गत ग्रंथपेटीचा कोलंबो (श्रीलंका) येथे शुभारंभ झाला. या वेळी श्री. ठाकूर बोलत होते. मूळचे नाशिकचे, पण सध्या कोलंबोत असलेले श्रीनिवास पत्की योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. कोलंबोतील मराठी वाचकांना अभिजात वाङ्‌मय उपलब्ध झाले आहे. श्री. रानडे म्हणाले, की जगभरात मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव केला जातो. मराठीतील अनेक लेखकांचे साहित्य नवी पिढी वाचत आहे. मराठी संस्कृतीच्या एका महत्त्वाच्या घटनेचे साक्षीदार होण्याचा हा सन्मान आहे, असे पत्की यांनी सांगितले. डॉ. कैलास कमोद, डॉ. वासुदेव भेंडे, अजित मोडक, अमर भागवत, नितीन महाजन, डॉ. सुभाष पवार, डॉ. चंद्रकांत संकलेचा, विक्रम उगले, विलास हावरे, अमित शहा, मंगेश पंचाक्षरी, दीपांजली महाजन, मंगला कमोद, ज्योती ठाकूर, माधुरी हावरे, अनघा मोडक, लता भेंडे, शीतल पवार, लीना शाह, अर्चना भागवत, रुचिता ठाकूर, कादंबिनी ठाकूर आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colombo-Marathi