शौर्याच्या इतिहासात ‘एव्हिएशन’ रोल मॉडेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

‘आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ‘ऑपरेशन पवन’दरम्यानच्या लढाया असोत, की सियाचीन हिमनदी येथील २० हजार फूट उंचीवरील बर्फाळ युद्धभूमीवरील १९८४ चे ‘मेघदूत ऑपरेशन’; यासारख्या अनेक आव्हानात्मक स्थितीत शौर्य व कौशल्याद्वारे वैमानिकांनी कामगिरी बजावली आहे,’’ अशा शब्दांत लष्कराचे सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील ‘आर्मी एव्हिएशन’च्या कामगिरीचा गौरव केला.

नाशिक - ‘आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ‘ऑपरेशन पवन’दरम्यानच्या लढाया असोत, की सियाचीन हिमनदी येथील २० हजार फूट उंचीवरील बर्फाळ युद्धभूमीवरील १९८४ चे ‘मेघदूत ऑपरेशन’; यासारख्या अनेक आव्हानात्मक स्थितीत शौर्य व कौशल्याद्वारे वैमानिकांनी कामगिरी बजावली आहे,’’ अशा शब्दांत लष्कराचे सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील ‘आर्मी एव्हिएशन’च्या कामगिरीचा गौरव केला.

कोविंद यांच्या हस्ते आज गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन’च्या (कॅट) तळावर विशेष ध्वज प्रदानाद्वारे (प्रेसिडेंट कलर) ‘कॅट’ला गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोशियारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, आर्मी एव्हिएशनचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल कवलकुमार आदी उपस्थित होते. सुरवातीला सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. आर्मी एव्हिएशनचे कमांडंट ब्रिगेडिअर सरबजितसिंह बावा भल्ला यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले. निशाणाला मानवंदना देण्यात आल्यानंतर कोविंद यांच्याकडून कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांनी निशाण स्वीकारले.

लढाऊ ‘रुद्र’चे प्रथमच दर्शन
लष्करी हवाई विभागाच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक ‘अपाचे’ ही लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे हवाई दलासोबतच तोफखान्याच्या ‘कॉम्बॅक्‍ट ॲव्हिएशन’ची घातक क्षमता वाढणार आहे. आज लष्कराचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ‘कॅट’च्या तळावर प्रथमच ‘रुद्र’ या लढाऊ हेलिकॉप्टरचे दर्शन घडले.

युद्ध, शांतता काळात 
लष्कराच्या हवाई विभागाने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दलाच्या कामगिरीचा गौरव आज कोविंद यांच्या हस्ते करड्या रंगातील निशाण (ध्वज) देऊन करण्यात आला. गांधीनगरच्या ‘कॉम्बॅक्‍ट आर्मी एव्हिएशन स्कूल’च्या मैदानावर हा सोहळा रंगला. सोहळ्यात गांधीनगरच्या तळावर ‘ध्रुव’, ‘चिता’, ‘चेतक’ आणि ‘रुद्र’ या हेलिकॉप्टरने राष्ट्रपतींना मानवंदना दिली. यानिमित्ताने दर्शन घडलेल्या ‘रुद्र’ या घातक लढाऊ हेलिकॉप्टरला पाहण्याची जवानांमध्ये उत्सुकता दिसली. ‘रुद्र’ पहिल्यांदा सादर झाले. 

युद्धभूमीवर लष्कर विशिष्ट रंगाचा ध्वज घेऊन लढते. एखादा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतो, विविध पातळ्यांवर मर्दुमकी गाजवतो, त्या वेळी राष्ट्रपतींकडून त्या विभागाला निशाण देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. 

प्रत्येक विभागाला एकदाच 
हा बहुमान मिळतो. निशाण म्हणजे त्या दलाची ओळख बनते. आज 
अशाच महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निशाण मिळालेल्या ‘कॅट’ला ‘अपाचे’ हे लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहे. 

शत्रूवर तुटून पडण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टरही लवकरच या तळावर दाखल होण्याची शक्‍यता आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ही चर्चा होती. अत्याधुनिक ‘अपाचे’ या हेलिकॉप्टरमुळे खऱ्या अर्थाने तोफखान्याच्या हवाई विभागाची क्षमता वाढणार असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: combat army aviation roll model ramnath kovind