आमदार पतीसह अन्य एकाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार!

WALCHANDNAGAR.jpg
WALCHANDNAGAR.jpg

निजामपूर (धुळे) : साक्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रलोभने दाखवून खुलेआम प्रचार केल्याप्रकरणी विद्यमान आमदार पती डॉ. तुळशीराम गावित यांच्यासह धुळे येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर जयराम मोहन गावित यांच्याविरुद्ध महायुतीचे पराभूत उमेदवार इंजि. मोहन गोकुळ सूर्यवंशी यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ई-मेलने तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात जयराम मोहन गावित हे फार्म मॅनेजर म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असून मतदानाच्या दिवशी खुलेआम प्रचारावर बंदी असतानाही ते रजा टाकून सायने (ता. साक्री) येथे आमदार पती डॉ. तुळशीराम गावित यांच्यासोबत अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांचा पूर्णवेळ खुलेआम प्रचार करताना आढळून आल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, शासकीय सेवेत असूनही निवडणूक काळात रजा टाकून पूर्णवेळ खुलेआम प्रचार केल्याप्रकरणी जयराम गावित यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याची मागणी इंजि. सूर्यवंशी यांनी केली आहे. तसेच प्रचार थांबलेला असतानाही डॉ. तुळशीराम गावीत यांनी प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदारांना प्रलोभने दाखविल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत केलेला आहे. संबंधितांची छायाचित्रे पुरावा म्हणून सादर करण्यात आली असून इंजि. सूर्यवंशी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com