‘स्मॉर्ट ॲप’, ‘कॉलसेंटर’वर तक्रारींचा पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

जळगाव - शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे लवकर निवारण व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे ‘स्मार्ट जळगाव’ हे ‘ॲप’ तसेच ‘कॉलसेंटर’ तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर ‘ॲप’ व ‘कॉलसेंटर’च्या माध्यमातून तीन दिवसात शहरातील नागरिकांनी १५८ तक्रारींची नोंद केली असून सर्वांत जास्त आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारी आहेत. 

शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण आदी विभागातील तक्रारींचे जलद पद्धतीने सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे ‘स्मार्ट जळगाव’ ॲप व ‘कॉलसेंटर’ सुरू केले आहे. ‘स्मार्ट जळगाव’ ॲप्स द्वारे नागरिकांना मनपाच्या संबंधित विविध ९० प्रकारच्या तक्रारी नोंदविता येत आहे. तसेच ‘कॉलसेंटरच्या’ माध्यमातून नागरिकांना ज्या विभागातील परवानगी, प्रमाणपत्र अन्य कोणत्या कामांची माहिती ही कॉलसेंटरच्या माध्यमातून दिली जात आहे. या माध्यमातून तीन दिवसात १५८ तक्रारी आल्या आहे. आलेली तक्रार ही एसएमएस, कॉलसेंटरच्या माध्यमातून आलेली तक्रार कॉल रॅकार्डींग ही संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित पाठविली जाणार आहे. याबाबत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना मनपातर्फे तक्रारी निवारण व सोडविलेल्या तक्रारींचे नोंद करण्यासाठी युजर पासवर्ड आज देण्यात आले आहे. 

तीन दिवसांत तक्रार सोडविली जाणार
मनपाच्या सर्व विभागातील तक्रारींबाबत संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना प्रणाली समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आधी सात दिवसाची तक्रार सोडविण्याची वेळ ठेवून हळूहळू रुटींग नुसार तीन दिवस तक्रार सोडविण्याचा कालावधी निश्‍चित केला जाणार आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख योगेश बोरोले यांनी माहिती दिली.
४९८ जणांनी केले 

ॲप्स डाऊनलोड
महापालिकेने ‘जळगाव स्मॉर्ट’ या ॲप्स तयार केले आहे. तीन दिवसात ४९८ जणांनी हे ॲप्स डाऊनलोड केले आहे. या ॲप्स द्वारे मनपाचे विविध विभागाच्या ९० प्रकारच्या तक्रारी नोंदविता येणार आहे. तसेच तक्रारीचे निवारण झाले की नाही पाहता येणार आहे.

Web Title: Complaints about Smart App, Callcenter

टॅग्स