Loksabha 2019 : भाजपच्या बैठकांना हजेरी लावणारे विखे पाटील काँग्रेसचाच प्रचार करतील: थोरात

Nashik
Nashik

नाशिक : भाजपच्या बैठकांना हजेरी लावून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या उमेदवारांचाच प्रचार करतील, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगाविला.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील नगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. राधाकृष्ण विखे पाटील अद्याप काँग्रेसमध्ये असून, काँग्रेसने त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला आहे. विखे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेवेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज (गुरुवार) नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांची प्रचार सभा झाली. या सभेला शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास विखे पाटील सार्थ ठरवतील, विश्वासहर्ता काय असते, हे विखे पाटलांना माहीत आहे. तो सार्थ करण्याचा प्रयत्न विखे पाटील करतील आणि काँग्रेसला ताकद मिळवून देतील. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला राडा लोकशाहीला लांच्छनास्पद आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणती परिसिमा गाठत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा राडा आहे. बारामती जिंकायला निघालेल्या गिरीश महाजनांना त्यांच्याच मतदारसंघात विरोध आहे. महाजनांनी आता बारामतीचा विचार सोडून द्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com