राष्ट्रवादीला 'ओव्हरटेक'ची कॉंग्रेसची रणनीती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नाशिक ः कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे पाहिले जायचे. मात्र, पक्षांत आलेली मरगळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळविलेल्या वरचष्म्यामुळे कॉंग्रेसला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिस कारवाईत "राष्ट्रवादी'चे नेते गुंतले जाऊ लागल्याने कॉंग्रेसने आता राष्ट्रवादीला "ओव्हरटेक' करण्याची रणनीती आखली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 24) महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकींचा बिगुल फुंकला. कॉंग्रेस भवनात सोमवारी (ता. 26) दुपारी दीड वाजता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक होत आहे.

जिल्ह्याचे प्रभारी आमदार के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील; तसेच पक्षाचे आजी-माजी आमदार-खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

Web Title: congress strategy to overtake ncp