वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी "आरटीओ'ची सोमवारपासून विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नाशिक - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 40 दिवसांची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेस सोमवार (ता. 5)पासून सुरवात होईल. याअंतर्गत अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर वाहनांचीही तपासणी व कारवाई केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.
दरम्यान, आजही शाळांबाहेर विद्यार्थी वाहतुकीची स्थिती चिंताजनकच असल्याचे चित्र बघायला मिळाले.

आरटीओ कार्यालयातर्फे चार प्रमुख मुद्द्यांवर मोहीम राबविली जाणार आहे. यात अवैधरीत्या जिपमध्ये केली जाणारी वाहतूक, स्क्रॅप झालेल्या वाहनांवर कारवाई, रिक्षात पुढे बसवून प्रवासी वाहतूक, खासगी वाहनांमध्ये विद्यार्थी वाहतुकीवर कारवाई केली जाणार आहे. गणवेश परिधान न करणाऱ्या रिक्षा, टॅक्‍सीचालकांवरही कारवाई होणार आहे. आज जनजागृतीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासमवेत 20 अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी संवाद साधत माहिती दिली.

Web Title: Consistent discipline traffic "RTO's special campaign