ग्रामीण भागात कापसासाठी व्‍यापारी शेतकऱ्यांच्‍या दारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कळमसरे (ता. अमळनेर) - ग्रामीण भागात सध्या कापसाच्या विक्रीत तेजी दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर रोख व्यवहारात मंदी आल्याने धनादेशाद्वारे सर्वत्र व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. व्‍यापारी हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्‍या थेट दारी जावून कापूस खदेरी करीत आहेत. 

गेल्या दोन महिन्यापूर्वी कापसाचे भाव अत्यंत कमी होते. मात्र, सद्यःस्थितीत सुमारे सहा हजार प्रतिक्विंटलपर्यंत कापसाची खरेदी व्यापारी करीत आहेत. यामुळे घरात साठवून ठेवलेला कापूस शेतकरी विक्री करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात व्यापारी ट्रक नेऊन कापूस भरून नेत आहेत. एकेक गल्लीत तीन तीन ट्रक ग्रामीण भागात आढळून येत आहेत. 

शेतकऱ्याच्या दारावरूनच व्यापारी कापूस नेत असल्याने शेतकऱ्यांनाही यातून दिलासा मिळत आहे. रोखीने व्यवहार होत नसल्याने धनादेशाद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू आहेत. मात्र, हे धनादेश वटविण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना बॅंकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.

Web Title: Cotton farmers in rural areas to commercial door