कापूस हमीभावावरून पाशा पटेल धारेवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा मिळेल, यासाठी तुम्ही काय केले? असा जाब शेतकऱ्यांनी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना विचारला. मात्र, अध्यक्ष पटेल यांनी ही वेळ राजकीय भाषणाची नाही, असे सांगून वेळ मारून नेली.

येथील जिल्हा नियोजन भवनात आज ‘आत्मा’ अंतर्गत कापूस उत्पादक शेतकरी, गट शेती करणारे शेतकरी, शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळा झाली. त्यात हा प्रकार घडला. अध्यक्ष पटेल यांनी गटशेतीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समोरच्या कंपनीला हव्या त्या दर्जाचे उत्पादन देऊन कापसाला अधिक भाव घेता येईल, याबाबत मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कापूस सध्या कमी दरात विकावा लागतो आहे. तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे अध्यक्ष आहात, तुम्ही कापसाला अधिक भाव मिळण्यासाठी काय केले? गटशेतीत शेतकरी नसतात. ठराविक लोकांचाच त्यात फायदा होतो, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावल येथील डिगंबर बडगुजर म्हणाले, की मंत्री गिरीश महाजन यांनी सत्तेत नसताना कपाशीला सात हजार दर मिळण्यासाठी आंदोलन केले होते. सत्तेत आल्यानंतर ते हमीभावाबाबत एक शब्दही बोलत नाहीत. तुम्ही सत्तेत आहात. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षही आहात तुम्ही सांगाल तो भाव कपाशीला मिळेल. मग तुम्ही हे का करीत नाहीत. यावर अध्यक्ष पटेल म्हणाले, की ही राजकीय सभा नाही. मी मते घ्यायला आलो नाही. मला केवळ शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कशातून मिळेल, हे सांगण्यासाठी आलो आहे. कृपया खाली बसावे.

असोदा येथील किशोर चौधरी म्हणाले, की खानदेशात सर्वाधिक कापूस पिकतो. तुम्ही म्हणतात नवीन तंत्रज्ञानामुळे एकरी कपाशीचे उत्पादन वाढेल. मग ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत का पोचत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक व्यथा आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton Minimum Support Price Issue Pasha patel