गो-विज्ञान व्याख्यानमालेस कलशयात्रेने प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

जळगाव - शहरातील आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे आजपासून गो-विज्ञान व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने निघालेल्या भव्य कलशयात्रेने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. ४ ते ८ जानेवारीदरम्यान आयोजित या व्याख्यानमालेतून अयोध्यानिवासी बालसाध्वी राधे नंदिनी गो-महिमा कथन करणार आहेत.

आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे पांझरापोळ संस्थान येथे ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यानिमित्त आज दुपारी भवानी मंदिरापासून पांझरापोळपर्यंत भव्य कलशयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी विजय काबरा, पावन मित्तल, बालकिसन अग्रवाल, शरद झंवर, अशोक धूत, राजेश बन्सल, सुरेंद्रसिंह उपस्थित होते. आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी कलशयात्रेत अग्रभागी होते.

चार दिवस गो-महिमा कथन
नेरी नाका परिसरातील श्री पांजरापोळ संस्थेत (गोशाळा) अयोध्यानिवासी बालसाध्वी राधे नंदिनीजी यांच्या मुखाद्वारे संगीतमय कथेला आजपासून सुरवात झाली. याप्रसंगी आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अनिता भुतडा, दीपा तापडिया, शारदा सारडा, किरण शर्मा, शैला तोडा, नीलकमल टाक, विद्या शर्मा, कीर्ती काबरा, मंगला झंवर, अर्चना पाटील, अलका लढ्ढा, प्रशांती सोनवणे, स्वर्णलता गुंगड, जया तिवारी, शुभ्रा व्यास, भारती ओझा, मंजू पुरोहित, शकुंतला शर्मा, तारा बिर्ला आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: cow-science lecture