तोतया परीक्षार्थीसह दोघांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नाशिक - नाशिक ग्रामीण पोलिस शिपाई भरतीत मंगळवारी (ता. 10) झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान तोतया परीक्षार्थी आढळून आला. तसेच अंगझडतीत त्याच्याजवळ मोबाईल असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी तोतया परीक्षार्थी आणि मूळ उमेदवारावर आडगाव (नाशिक) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. देवसिंग अमरसिंग जारवाल (वय 21; डावरगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे या तोतया उमेदवाराचे नाव असून, तो वीरसिंग भागचंद कवाळे (रा. लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याच्याऐवजी परीक्षेला बसला होता.

नाशिक - नाशिक ग्रामीण पोलिस शिपाई भरतीत मंगळवारी (ता. 10) झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान तोतया परीक्षार्थी आढळून आला. तसेच अंगझडतीत त्याच्याजवळ मोबाईल असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी तोतया परीक्षार्थी आणि मूळ उमेदवारावर आडगाव (नाशिक) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. देवसिंग अमरसिंग जारवाल (वय 21; डावरगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे या तोतया उमेदवाराचे नाव असून, तो वीरसिंग भागचंद कवाळे (रा. लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याच्याऐवजी परीक्षेला बसला होता. येथे 82 जागांसाठी होत असलेल्या पोलिस शिपाई भरतीत लेखी परीक्षेचा हजेरीपट पडताळणीच्यावेळी प्राधिकृत अधिकारी अतुल झेंडे यांना फोटो पडताळणीत जारवालचा संशय आला. 

Web Title: Crime against both with test taker