चाळीसगावच्या संशयीतांचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

फरारींचे अटकपुर्व फेटाळले
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर पसार झालेले संशयीत सोमनाथ खंडू निकम, रवी खंडू निकम, रंगनाथ नाना मांडोळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्जही आजच बुधवारी न्यायालयाने फेटाळले आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. केतन ढाके, संशयितातर्फे ऍड. व्ही. आर. ढाके यांनी कामकाज पाहिले.

जळगाव - चाळीसगाव येथील दाम्पत्याच्या जागी बनावट दाम्पत्य उभे करून त्यांच्या नावावरील जमिनीचे 7 एप्रिल 2016 मध्ये खरेदी खत केले होते. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यात दोन संशयिताना अटक करण्यात आली. संशयितांनी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज बुधवारी फेटाळला आहे. याच प्रकरणातील तीन संशयितानी दाखल केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्जही बुधवारी न्यायाधीश पटणी यांनी फेटाळला आहे.

चाळीसागाव येथील सुधीर निकम आणि अनिता निकम यांच्या नावावर असलेली मिळकत हडप करण्यासाठी त्याच नावाचा बनावट व्यक्ती बसवून 7 एप्रिल 2016ला जमीन विक्री केली होती. संशयितानी सुधीर निकम यांना डांबून ठेवून 25 हजार रुपये रोख आणि सह्या केलेले 36 धनादेश घेतले होते. या प्रकरणी निकम यांनी 19 डिसेंबर 2016ला चाळीसगाव पोलिस ठाण्यात सहा संशयितांच्या विरोधात तक्रार दिल्या वरून गुन्हा दाखल होता. तपासाधिकाऱ्यांनी सोमनाथ श्रावण पांचाळ, सुरेश राजू नाईक यांना 12 जानेवारीला अटक केली, पोलिस कोठडीची मुदत पुर्ण होवुन अटकेतील संशयीत न्यायालयीन कोठडीत अर्थात कारागृहात आहेत. त्यांनी न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर कामकाज होवुन दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर बुधवारी न्या.ए.के.पटणी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

फरारींचे अटकपुर्व फेटाळले
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर पसार झालेले संशयीत सोमनाथ खंडू निकम, रवी खंडू निकम, रंगनाथ नाना मांडोळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्जही आजच बुधवारी न्यायालयाने फेटाळले आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. केतन ढाके, संशयितातर्फे ऍड. व्ही. आर. ढाके यांनी कामकाज पाहिले.

Web Title: crime in chalisgaon