निवडणूक काम नाकारल्याने आणखी पाच शिक्षकांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

मेहुणबारे (जळगाव) : मतदान केंद्र अधिकारी म्हणून काम करण्यास नकार देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी पुन्हा पाच शिक्षकांच्या विरोधात तहसिलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आतपर्यंत तालुक्यातील नऊ शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.

पूर्वी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) असलेल्या  शिक्षकांची बदली झाली आहे.त्यामुळे नविन आलेल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या पदावर मतदार नोंदणी अधिकारी म्हणून  चाळीसगाव भाग व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ यांच्याकडील आलेल्या आदेशानुसार नेमणूक होणार आहे.मात्र, या आदेशाचे पालन केले जात नसल्याने दोन दिवसात नऊ शिक्षकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भवाळी (ता.चाळीसगाव) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शंकरसिंग राजपुत व शिदवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती कल्पना वाणी, यांनी निवडणुक कामाचे आदेशाचे पालन केले नाही, वरिष्ठांचा अवमान केला म्हणून तहसिलदार कैलास देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव भागातील गुजरदरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विवेक पाटील,चितेगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका विद्या मोरे,गणपुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिगंबर राजपुत या तिन्ही शिक्षकांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान काल झालेल्या कारवाईनंतर आज दहा शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती तहसिलदार कैलास देवरे यांनी सकाळ शी बोलतांना दिली. अजुन काही शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: crime filed against 5 teacher for rejecting election duty