बँक व्यवस्थापकावर हल्ला करणारे सराईत गुन्हेगार ताब्यात 

दीपक कच्छवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

चाळीसगाव येथुन उंबरखेडे येथे  जाण्यासाठी निघालेले  महाराष्ट्र बॅकेच्या शाखा व्यवस्थापक अभिजीत काळकर व स्वप्नील देवकर यांना देवळी गावाजवळून उंबरखेडे येथे जाणार्‍या कच्च्या रस्त्याने दोघेही जात होते.पैसे लुटनण्याच्या हेतुने उंबरखेडे गावाकडुन काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले.

मेहुणबारे ता. चाळीसगाव : उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील महाराष्ट्र बॅकेच्या शाखेचे शाखा व्यवस्थापक व कॅशियरवर  देवळी- उंबरखेडे या रस्त्यावर पाच हाल्लेखोरांनी बॅकेच्या व्यवस्थापकावर चाकूने हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असुन हल्ला करणाऱ्या एकावर  खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

चाळीसगाव येथुन उंबरखेडे येथे  जाण्यासाठी निघालेले  महाराष्ट्र बॅकेच्या शाखा व्यवस्थापक अभिजीत काळकर व स्वप्नील देवकर यांना देवळी गावाजवळून उंबरखेडे येथे जाणार्‍या कच्च्या रस्त्याने दोघेही जात होते.पैसे लुटनण्याच्या हेतुने उंबरखेडे गावाकडुन काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले. तोंडाला रुमाल बाधलेले 20 ते 25 वयोगटातील पाच  तरूणांनी  बॅकेचे व्यवस्थापक श्री काळकर यांच्या हातातील बॅग हिसकावून त्यातील दोघांनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकूने मानेवर वार करत असतांना हात अडवा केल्याने त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्या.त्यानी लगेच श्री देवकर  यांच्याकडे आपला मोर्चा वळवला मात्र देवकर हे तेथून शेतामध्ये आरडाओरडा करत  पळत सुटले.त्याठिकाणी पुन्हा देवळी गावाकडुन दोन तरूण दुचाकीने तेथे आले. त्यांनी या तिघांना सांगितले की शेतातील काही लोक येत आहेत.असे समजताच दोघेही दुचाकीवरून आलेले पाचही जणांनी तेथून  लगेच पळ काढला. या पाचही संशयितांवर मेहुणबारे पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तिन संशयीत ताब्यात 
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हीरे यांच्याकडे या घटनेचा तपास होता.त्यांनी अवघ्या सात तासातच या घटनेचा छडा लावुन दोघांना काल (ता.29) रोजीच रात्री ताब्यात घेतले होते. यातील मुख्य सूत्रधार उंबरखेडे येथील असल्याने त्यालाही पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. यामध्ये संशयित आरोपी  समाधान रामदास म्हस्के, वसंत राजु बच्छाव हे  दोन्ही( रा चाळीसगाव) तर तिसरा  साहेबराव उर्फ सायबु विक्रम कोळी (राहणार उबंरखेड) या तिघा संशयीतांना अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यालयाने त्यांना पाच  दिवसांची पोलीस कोठडी दिली.या तिन्ही संशयीतांनी  गुन्ह्याची कबुली देत हाल्यासाठी वापरलेल्या दोन चाकुंपैकी ऐक काढुन दिला.यातील तिघांकडुन अजुन काही माहिती मिळते का याचा तपास सध्या पोलिस घेत आहेत. या गुन्हयातील अजुन दोन फरार असुन त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हीरे यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले. या अरोपींना पकडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक श्री.शेख, ताहेर तडवी, गोपाल पाटील, गोरक चकोर, भटु पाटील, रवी पाटील, दीपक पाटील, आदीनी ही कामगिरी केली.

अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- जयपाल हीरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

Web Title: criminal arrested in Mehunbare