अडत्यांच्या बंदमुळे कोटीची उलाढाल ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

दीडशेवर अडते सहभागी; बाजार समितीचा कारवाईचा इशारा
जळगाव - राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमनातून भाजीपाला वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात अडते (व्यापारी) तसेच हमाल व माथाडी कामगारांनी आजपासून (११ जुलै) बेमुदत बंद पुकारला. अडत्यांचा बंद व पावसामुळे आज मुळातच भाजीपाल्याची आवक कमी होती, जो माल आला तो शेतकऱ्यांनी रस्त्यावरच विकला. दरम्यान, या बंदमध्ये जळगाव बाजार समितीतील सर्व दीडशेवर अडते सहभागी झाले होते. त्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात आजपासून भाजीपाला मार्केटने बंद पुकारला आहे. जळगाव बाजार समितीतील अडत असोसिएशनचे सुमारे दीडशेवर सदस्य या संपात सहभागी झाले व बाजार समिती पूर्णपणे बंद ठेवली. त्यामुळे दिवसभरात सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

मापाड्यांचा पाठिंबा
अडत्यांच्या या बंदला हमाल-मापाड्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मार्केटमध्ये प्रत्यक्ष सक्रिय असलेल्या दोनशेवर मापाड्यांनी बंदमध्ये सहभागी होत व्यापाऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली. शासनाच्या निर्णयामुळे हमालांवरही उपासमारीची वेळ येणार असल्याने या संपात सहभागी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बाजारपेठेवर परिणाम नाही
अडत्यांचा बंद व दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून आज मूळातच मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी माल आणला नव्हता. ज्यांनी माल आणला, तो त्यांनी परस्पर मार्केटबाहेरच रस्त्यावर बसून विकला. मात्र, इतर बाजार समित्यांमधून येणाऱ्या मालाच्या आवकवर परिणाम झाल्याने बटाटे, मिरची आदींचे दर वाढले होते.

अडत्यांनी संपाबाबत कोणतेही निवेदन दिलेले नाही. त्यांचा संप किती दिवस राहणार आहे, याबाबत अडत्यांनी चर्चाही केलेली नाही. त्यामुळे संप सुरू राहिल्यास अडत्यांना नोटीस बजावण्यात येईल.
- सोपान पाटील सचिव, कृउबा, जळगाव

बाजार समितीत आज ४० क्रेट वांगी विक्रीसाठी आणली होती. मात्र, अडत्यांनी व्यवहार बंद ठेवल्याने ती स्वतःच विक्री केली. त्यामुळे सहा टक्के अडत वाचली आणि वाहतूक खर्च भरून निघाला.
- तुळशीराम साळुंखे, पथराड, जि. जळगाव

शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याने भाजीपाला महागणार आहे. तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वही धोक्‍यात येणार आहे. हमालांवरही उपासमारीची वेळ येईल. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत बंद सुरूच राहील.
- गुलाबशेठ आहुजा, उपाध्यक्ष, मार्केट अडत असोसिएशन

Web Title: crore turnover jam