उन्हाळी सुट्टयांमूळे भाविक पर्यटकांची वणी गडावर गर्दी

vani
vani

वणी (नाशिक) : उन्हाळी सुट्टयांमूळे आदिशक्ती सप्तशृंगीच्या गडावर भाविक व पर्यटकांच्या वाढत्या गर्दी बरोबरच गडावर नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर हजेरी लावत आहे. त्यामुळे गडावर उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

सप्तश्रृंगी गडावर वर्षभर भाविकांचा राबता कायम सुरुच असतो. असे असले तरी आदिमायेच्या दरबारात दरवर्षी चैत्र व वैशाख महिन्यात भाविक नवसपूर्तीसाठी  मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे गडावर चैत्रोत्सव संपला असला तरी भाविक व पर्यटकांचा राबता कायम असून दर मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी नवसपूर्ती करणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी होत आहे. मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्याने आज गडावर नवसपूर्ती मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. त्यामुळे गडावरील धोड्याकोंड्याच्या विहिरीपासून शिवालय तलावापर्यंतच्या परिसरात ठिकठिकाणी मंडप टाकून तसेच झाडांच्या सावलीचा आसरा घेत गोड व तिखट स्वयंपाक व नवसपूर्तीचा धार्मिक विधी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यात मुख्यत्वे बोकडबळी विधी (कारणे) कार्यक्रमांची संख्या जास्त असल्याने आज सुमारे सव्वाशे बोकडांचा बळी देण्यात आला आहे. त्यामूळे जागोजागी सांयकाळी उशीरापर्यंत तिखट, गोड पंगती होत असल्याचे चित्र दिसत होते.

गडावर जागे अभावी व स्वयंपाक व पिण्याची गैरसोय टाळण्यासाठी नांदुरी परिसरातील पहिली पायरी, कळवण, वणी, अभोणा रस्त्यावरील पाण्याची व सावलीची सोय बघून ठिकठिकाणीही नवसपूर्तीच्या तिखट, गोड जेवनावळी होत होत्या. दरम्यान, गडावर उन्हाळा सुरु होताच स्थानिकांबरोबरच भाविकांना पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या मागील वर्षी भवानी तलावाची गळती रोखून तलावातील गाळ काढल्यामूळे सुटली आहे. तलावात अजून एक महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने गडावर दिवसाआड सुरळीत व मुबलक पाणी पूरवठा होत आहे. नवसपूर्ती करणाऱ्या भाविकांना पाणी पूरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीने १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवली आहे. मात्र नवसपूर्ती करणाऱ्या भाविकांना सदर टाकीतील पाणी कमी पडत असल्याने व स्वयंपाकासाठी पाणी या टाकीवरुन वाहने शक्य होत नसल्याने काही भाविक येतांनाच प्लॅस्टिक ड्रम भरून आणत आहे तर, काही गडावर खाजगी टँकरद्वारे तीनशे ते पाचशे रुपये देवून पाणी भरून घेत आहे. पिण्याचे पाण्याचे जार हे येतांनाच भाविक घेवून येत असल्याने पाण्यासाठी नवसपूर्ती करणाऱ्या भाविकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. दरम्यान आज दिवसभरात गडावर पन्नास हजारावर भाविकांनी दर्शन घेतले असून भाविकांच्या गर्दीमूळे गडावर उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी गडास पाणी पूरवठा करणाऱ्या भवानी तलावाचे गळती रोखण्याचे काम केल्यामूळे गडावरील वर्षानूवर्ष असलेली पाणी प्रश्न तुर्त मिटला आहे. गडावर दिवसाआड नियमित व मुबलक पाणी पूरवठा केला जात आहे. नवसपूर्तीसाठी येणारी भाविकांची होणारी भाविकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय व विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने नवसपूर्तीसाठी भाविकांना ५०० लिटरचे पाणी जलशुध्दी केंद्रात आजपासून मोफत उपलब्ध करुन देत आहोत. भाविकांनी यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
- राजेश गवळी,  उपसरंपच सप्तशृंगी गड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com