सावधान! पावसाळ्यात सेल्फीचा मोह बेतेल जिवावर

Tourists risking their lives to take selfies.
Tourists risking their lives to take selfies.esakal

शहादा (जि. नंदुरबार) : निसर्गरम्य उनपदेव सातपुड्याच्या दरम्यान दरा प्रकल्पाजवळ असलेले उनपदेव (ता.शहादा) हे ठिकाण गरम पाण्याच्या झरा म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

परंतु सेल्फी साठी जीव धोक्यात टाकत असल्याने त्यांना मज्जाव करणारे कुणीही नाही. सेल्फी पर्यटकांचा जिवावर बेतू शकते. यासाठी प्रशासनाने दखल घेऊन निदान सुट्टीच्या दिवशी तरी पोलिस बंदोबस्त ठेवल्यास भविष्यात घडणाऱ्या वाईट दुर्घटनेला आळा बसू शकेल. (Crowd of tourists at Dara Project nandurbar Latest Marathi News)

शहादा- धडगाव रस्त्यावर दरा या ठिकाणापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर उनपदेव हे ठिकाण आहे. निसर्गरम्य असल्याने येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. विशेषत: पावसाळ्यात येथे मोठी गर्दी असते. येथे प्राचीन शिवाचे मंदिर असल्याने श्रावण महिन्यात भाविकांची वर्दळ वाढते.

लगतच खाली वाहणारी वाकी नदी साधारणतः १९६५ पासून या ठिकाणी मोठे कुंड बांधण्यात आल्याचे समजते . गरम पाण्याच्या झरा जेथून पडतो तेथे गोमुख बांधण्यात आले आहे. परंतु २००६ मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या गोमुखातून पडणाऱ्या गरम पाण्यात अंघोळ करण्यासाठी भाविक हजेरी लावतात. येथूनच पुढे काही अंतरावर दरा मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पामुळे येथील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

Tourists risking their lives to take selfies.
गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

बंदोबस्ताची मागणी
सध्या रिमझिम पाऊस सुरू असल्याने निसर्गाच्या आनंद लुटण्यासाठी तसेच धबधबेही ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात सेल्फी फोटो घेणारी ही तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे.

राज्यात व परिसरात सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन जीव धोक्यात टाकून सेल्फी घेणाऱ्यांना समज देणे गरजेचे आहे.

Tourists risking their lives to take selfies.
जळगाव : उपचारादरम्यान ‘त्या’ मयत वृद्धेची पटली ओळख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com