Latest Marathi News | म्हैस नदीवरील धरण ओंसडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

overflow dam on the Mhais River.

Nandurbar : म्हैस नदीवरील धरण ओंसडले

शहादा : लोंढरे (ता. शहादा) येथील म्हैस नदीवर बांधण्यात आलेले धरण जोरदार पावसामुळे काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. धरण भरल्याने परिसरातील कूपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. (dam on river Mhais overflowed Nandurbar Latest News)

गेल्या चार दिवसापासून शहादा तालुक्यासह परिसरात पाऊस सुरूच आहे. गुरुवारी (ता.१५) पहाटेपासून ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील पाऊस झाल्याने म्हैस नदीला पूर आला. लोंढरे येथील धरण पावसाळ्यात भरलेले होते. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती.

धरण साधारणतः ७० टक्के भरले होते. या पावसामुळे धरण पुन्हा काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. परिसरातील १६ गावे या धरणाच्या सिंचन लाभ क्षेत्रात येतात. कळंबू गावापर्यंत धरणातून पाण्याचे पाट काढलेले आहेत.

गेल्या वर्षीच परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार धरणाची दुरुस्ती करण्यात आली होती. मुख्य बांधला भेगा पडल्याने पाण्याच्या निचरा होत होता. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मंत्री डॉ. विजयकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरण दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या.

धरण दुरुस्त झाल्यामुळे आता एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाणी टिकू शकेल. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक धरण असून, शंभर टक्के भरल्याने शेतकरी आनंदित झाला असल्याचे जयननगर येथील महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी यांनी म्हटले आहे.