पुराच्या पाण्याने खचला रस्ता; वाहतुक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

धुळे : गुरुवारी ( ता. २६) मुसळधार पाऊस झाल्यानंतर फागणे ते अमळनेर महामार्गावरील धांदरणे नाल्यावरील काही भाग रात्री दोनच्या सुमारास आलेल्या पूरात वाहून गेला. यामुळे महामार्गावरील वाहतुक अजंग - अबोडे आणि वरखेडी - वणी मार्गे वळविण्यात आली आहे.

धुळे : गुरुवारी ( ता. २६) मुसळधार पाऊस झाल्यानंतर फागणे (ता.धुळे) ते अमळनेर महामार्गावरील धांदरणे नाल्यावरील जमीन रात्री दोनच्या सुमारास आलेल्या पूरात वाहून गेली. यामुळे महामार्गावरील वाहतुक अजंग अंबोडे आणि वरखेडी वणी मार्गे वळविण्यात आली आहे.

 

बांधकाम सुरू असलेल्या या पुलाला पाईप टाकलेले नव्हते. याच्या बाजूला एका मोठ्या पुलाचे काम देखील सुरु आहे. सहा महिन्यांपासून या पूलाचे  काम रखडत आहे अशी माहिती वणीचे उपसरपंच चुडामन पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damaged road with flood water; Traffic disrupted