पुनर्सर्वेक्षणानंतर धोकादायक वाडे पाडणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - पावसाळा लागण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावून कायदेशीर सोपस्कार पार पाडणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागाला धोकादायक घरे, वाडे पाडण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. त्यानंतर नगररचना विभागाने आता यापूर्वी केलेला सर्वेक्षण आराखडा बाजूला ठेवून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून त्यानंतर अशी घरे पाडण्यास सुरवात 
केली जाईल.

महापालिका आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात धोकादायक वाड्यांना तत्काळ पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून धोकादायक घरांना नोटिसा देऊन सोपस्कार पार पाडले जातात; परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नाही. दर वर्षी एकतरी वाडा वादळ किंवा पावसाने पडतो. त्यात आतापर्यंत जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अनेक वाडेधारक जीव मुठीत धरून वास्तव्य करतात. दर पावसाळ्यात वाड्याचे काय होईल, असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडतो. पण वाडेकरीही बाहेर पडण्याची हिंमत दाखवत नसल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे. शहरात सर्वाधिक वाडे पूर्व व पंचवटी विभागात असून, त्याची संख्या एक हजारांवर आहे. त्यातील धोकादायक घरे व वाड्यांची संख्या ३९७ आहे.

विभागनिहाय धोकादायक घरे
विभाग    धोकादायक वाडे
पंचवटी          ९७
पूर्व               १८८
नाशिक रोड    ६३
सातपूर          २१
सिडको           २८
एकूण            ३९७

न्यायालयीन दाव्यांचे काय?
बहुतांश वाड्यांबाबत न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वेक्षणात धोकादायक वाडे असले तरी त्यावर कारवाई करता येणार नसल्याने धोकादायक वाड्यांचा प्रश्‍न पुन्हा ‘जैसे थे’ राहणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच महापालिकेला कारवाई करावी लागणार आहे.

Web Title: dangerous Old Castle municipal resurvey