चाळीसगाव - दरातांडा येथे पाण्याची तीव्र टंचाई

दीपक कच्छवा
सोमवार, 19 मार्च 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटरवर असलेल्या दरातांडा (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती कायमची असल्याचे दिसत आहे. पन्नास वर्षांपासून नळाला पाणी आलेले नाही. गावात पाणीपुरवठा करणारी टाकी असली तरी, त्यात पाणीच टाकले जात नसल्याने  पाण्याची ती शो-पिस ठरली आहे. प्रशासनाने येथील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, आशी मागणी होत आहे.

मेहुणबारे (चाळीसगाव) : चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटरवर असलेल्या दरातांडा (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती कायमची असल्याचे दिसत आहे. पन्नास वर्षांपासून नळाला पाणी आलेले नाही. गावात पाणीपुरवठा करणारी टाकी असली तरी, त्यात पाणीच टाकले जात नसल्याने  पाण्याची ती शो-पिस ठरली आहे. प्रशासनाने येथील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, आशी मागणी होत आहे.

दरातांडा (ता.चाळीसगाव) येथील वस्तीची सुमारे चारशे लोकसंख्या आहे. मार्च महिन्यातच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जवळच्या कृष्णापुरी धरणात पाणी नसल्याने परिसरातील विहिरीची पातळी खालावली आहे. आशातच काही भागातील विहिरींना पिण्यायोग्य नाही. मात्र तांड्यावरील रहिवाशांना नाईलाजास्तव प्यावे लागत आहे. ज्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गावात पाणीच मिळत नसल्याने एक किलोमीटरवर पायपीट करून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कृष्णापुरी धरणात 'गिरणा'चे पाणी टाकले तर तांड्याचा पाणीप्रश्न सुटु शकतो. मात्र प्रशासन याबाबतीत उदासीन असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मे महिन्यात यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता.ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात आशी मागणी होत आहे.

दरातांडा येथे पाणी आणण्यासाठी जलवाहिनी नसल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच हातपंपावर वीजपंप बसविण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे, असे ग्रामसेवक वासुदेव पाटील यांनी सांगितले.

आमच्या  ताड्यांवरील पाणीटंचाईसंदर्भात  एक वर्षापासून सरपंचाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र त्याची दखलच घेतली जात नाही. हातपंपावर वीजपंप  बसवून ते पाणी टाकीत टाकावे तेथून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे किसन राठोड यांनी सांगितले. 

पाणी आणताना हाल होतात..
तांड्यावर पाणी मिळत  नसल्याने दुरवर भटकंती करून पाणी आणावे लागते. बऱ्याचदा ज्याच्या शेतात पाणी असते, ते भरू देत नाहीत. त्यामुळे भर उन्हात पायपीट करावी लागते. दूरवरून पाणी आणताना आम्हा महिलांचे खूपच हाल होतात, असे मत अक्काबाई चव्हाण यांनी व्यक्त केले. 

घरात पाणी दररोज लागत असते. आमच्या भागातील काही विहीरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे दूरवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी वेळ लागत असल्याने शेती कामाला जाता येत नाही, परिणामी रोजंदारी बुडते. त्यामुळे पाण्याची तातडीने व्यवस्था करावी. 

परिसरातील विहीरींचे पाणी दूषित असल्याने सर्दी खोकल्या सारखे साथीचे आजार होत आहेत. त्यामुळे आम्हाला शुध्द पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आमचे आरोग्य तरी चांगले राहील आम्हा तांडावासियांना कुठल्याच सुविधा नाहीत त्यामुळे महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे तो लवकर सोडवावा, अशी मागणी नमोबाई राठोड यांनी केली आहे. 

 

Web Title: dartanda chalisgao lack of water