दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरु परिवाराचे जेष्ठ सदस्य कासिम भाईसाहेब यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

इंदिरानगर (नाशिक) : दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरु परिवाराचे जेष्ठ सदस्य सय्यदी मझुनसाहेब कासिम भाईसाहेब हकीमुद्दीन (वय 89) यांचे आज सकाळी 10.00 वाजता सुरत येथे निधन झाले.

समाजाच्या येथील अल जामिया तुस सैफिया तुल बुरहानीया अरेबिक विद्यापीठात ते अमीरुल जामिया (अधीक्षक) म्हणून कार्यरत होते. अरेबीक भाषेचे ते गाढे अभ्यासक होते. विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षा आजपासून सुरु होणार होत्या. त्यासाठी परंपरेनुसार समाजाचे 53 वे धर्मगुरु सैय्यदना डॉ. अलिकद्र मुफद्दल सैफुद्दीन साहेब हे देखील सुरत येथे आले आहेत. त्यांनीच कासिम भाईसाहेब यांच्यासाठी खास नमाज पठन केले.

येथील मझहर ए सैफी कॉम्प्लेक्स मधे त्यांचा दफनविधी करण्यात आला. कासिम भाईसाहेब हे समाजाचे 51 वे धर्मगुरु सैय्यदना डॉ. ताहेर सैफुद्दीन साहेब यांचे पुत्र तर 52 वे धर्मगुरु सैय्यदना डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन साहेब यांचे बंधू होते.

Web Title: daudi bohara community guru kasim bhaisaheb expire

टॅग्स