आदिवासी कुटुंबावर प्राणघातक हल्ला; घरमालकाचा मृत्यु तर पत्नी, दोन मुले गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

संशयित हल्लेखोराने देखील रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे हल्ल्याचे कारण समजु शकले नाही. सदर घटना काल दि. ४ जुन च्या मध्यरात्रीच्या सुमारास उत्राण अहीर हद्द शिवारातील राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात घडली.

एरंडोल - तालुक्यातील उत्राण अहिर हद्द येथील शेतावर रखवालदारी करणा-या आदिवासी कुटुंबावर  मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यप्राषण केलेल्या संशयिताने प्राणघातक हल्ला केल्यामुळे पतीचा जागीच मृत्यु झाला आहे. या हल्ल्यात पत्नी, मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले. संशयित हल्लेखोराने देखील रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे हल्ल्याचे कारण समजु शकले नाही. सदर घटना काल दि. ४ जुन च्या मध्यरात्रीच्या सुमारास उत्राण अहीर हद्द शिवारातील राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात घडली. जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी घटना स्थळी भेट देऊन ग्रामस्थांकडून माहिती जाणुन घेतली.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी कि उत्राण अहिर हद्द (ता. एरंडोल) येथील राजेंद्र भागवत पाटील यांचे शेतात सुकलाल रिचा भिलाली (वय ३८) राहणार सेंदवा (मध्यप्रदेश) हे पत्नी पारूबाई भिलाली, मुलगी रिमा भिलाली व मुले गोविंद भिलाली, रतन भिलाली यांचेसह वास्तव्यास होते. ते याठिकाणी शेताच्या रखवालदारीचे काम करीत होते. काल दि. ४ जुन ला रात्री जेवण करून सर्व कुटुंब झोपलेले असतांना ज्ञानसिंग पालसिंग पावरा (अंदाजे वय ३५) हा मद्यप्राशन करून शेतात आला व त्याने कुऱ्हाड व दगडाने भिलाली कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात सुकलाल भिलाली यांचा जागीच मृत्यु झाला. तर त्याची पत्नी पारूबाई भिलाली (वय ३५) मुलगी रिमा भिलाली (वय १२), मुलगा गोविंद भिलाली (वय ८) हे डोक्यावर मोठे घाव झाल्यामुळे गंभीर जखमी झाले. तिनही गंभीर जखमींना जळगाव येथे शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Deadly attack on tribal family at erandol