मूकबधिर मुलीला मिळाला अनुरूप 'वर' 

दीपक कच्छवा
सोमवार, 2 जुलै 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) -  विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते. लांबे वडगाव (ता.चाळीसगाव) येथील बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या मूकबधिर मुलीला तिचे दुख: जाणुन घेणारा साथीदार मिळाला आहे. त्याच्याही स्वरयंत्रणेत स्वाराने बिघाड केला तो यासाठीच की, 'मेड फॉर इच अदर' (अनुरूप) असे जोडपे निर्माण व्हावे म्हणुनच.

मेहुणबारे (चाळीसगाव) -  विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते. लांबे वडगाव (ता.चाळीसगाव) येथील बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या मूकबधिर मुलीला तिचे दुख: जाणुन घेणारा साथीदार मिळाला आहे. त्याच्याही स्वरयंत्रणेत स्वाराने बिघाड केला तो यासाठीच की, 'मेड फॉर इच अदर' (अनुरूप) असे जोडपे निर्माण व्हावे म्हणुनच.

वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील दीपक पाटील यांची मुलगी नारायणी ही जन्मापासून मूकबधिर आहे. सुरवातीपासुनच तिला शाळेची व शिक्षणाची गोडी निर्माण झाली होती. तिचे पहीले ते बारावी पर्यंतचे शिक्षण चाळीसगाव येथील मूकबधिर विद्यालयात झाले आहे. प्रत्येक मुलीच्या वडिलांना वाटते की, मुलीला चांगला वर मिळावा. असेच नारयणीचे वडील दिपक पाटील यांना आपली मुलगी मूकबधिर असल्याने तिच्या सारखा वर मिळायला पाहिजे व सुखी राहीली पाहीजे यांची चिंता त्यांना लागली होती. यासाठी त्यांनी वरांची शोधाशोध करायला सुरवात केली. त्यांना मालेगाव तालुक्यातील चिंग्व्हाण येथील डॉ नारायण पवार यांचा मुलगा प्रशांत सोबत नारायणीचा विवाह ठरविला. प्रशांतही मूकबधिर आहे. तो सध्या नाशिक येथे बँकेत नोकरी करत आहे.

त्यामुळे मुलीला अनुरूप वर मिळाल्याने या विवाहासाठी  दोन्ही परिवारातील सदस्यांनी सहमती दर्शविली. त्यानुसार हा विवाह आज(ता.1)रविवारी चाळीसगाव येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात दुपारी दोनला समाजातील विविध मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त तहसिलदार दिवानसिंग पाटील मनिष पाटील, वडगाव लांबे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच राजु पाटील यांच्यासह वडगाव लांबे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन्ही महिलांनी घडवुन आणला विवाह...
मालेगाव तालुक्यातील पाळद येथील कोकीळाबाई पाटील व  वडगाव लांबे येथील वैशाली पाटील यांचे माहेर चिंग्व्हाण (ता.मालेगाव) येथील असल्याने त्यांनी सर्व माहिती घेतली व स्थळ योग्य असल्याने वैशालीबाई व कोकीळाबाई यांनी नारायणी व प्रशांतचा विवाह घडवुन आणला. त्यामुळे समाजात महिला ही आता कमी नाहीत याचे उत्तम उदाहरण या विवाह वरून दिसुन येते.

Web Title: deaf narayani got married to prashant pawar