काचा अंगावर पडून कामगाराचा मृत्यु

Residential
Residential

नाशिक: गंगापूर रोड परिसरातील शंकरनगरमध्ये नवीन बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या वाहनातून काचा उतरवित असताना, त्या अंगावर पडल्याने एका 30 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यु झाला. आज (ता.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
     कुंदन प्रमोद प्रजापती (30, मूळ रा. नालासोपारा, मुंबई, हल्ली. रा. अभिव्यक्ती सोसायटीजवळ, शंकरनगर, आनंदवल्ली शिवार, गंगापूर रोड, नाशिक) असे कामगाराचे नाव आहे. शंकरनगरमध्ये मोहीत नारंग यांच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. याठिकाणी आज दुपारी काचा घेऊन वाहन आले होते. या वाहनातील काचा उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कुंदन हा वाहनात चढून काचा उतरवित होता. त्यावेळी त्याच्या हातामध्ये काचांची थप्पी असताना अचानक ती निसटली आणि त्या काचा त्याच्या अंगावर पडल्या. त्यात त्याची मानही काचेवर आदळली असता, त्याच्या मानेला जबर दुखापत होऊन तो जागीच कोसळला. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. कुंदनच्या मानेला काचेच्या लागलेल्या मारामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com