लष्करी जवान मयुर पंडीत यांचा कोसी नदीत बुडून मृत्यू

संजय भागवत
बुधवार, 17 मे 2017

जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील सोनगाव येथील जवान मयुर सीताराम पंडित (वय 26) हे झारखंडमध्ये नियुक्त होते. मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत चौसालीजवळ कॅम्पसाठी जागेचा शोध घेत असताना त्यांचा पाय घसरून ते कोसी नदीत पडले. सहकाऱ्यांनी पुरेसे प्रयत्न करूनही मयुर त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील सोनगाव येथील जवान मयुर सीताराम पंडित (वय 26) हे झारखंडमध्ये नियुक्त होते. मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत चौसालीजवळ कॅम्पसाठी जागेचा शोध घेत असताना त्यांचा पाय घसरून ते कोसी नदीत पडले. सहकाऱ्यांनी पुरेसे प्रयत्न करूनही मयुर त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

मयुर हे 77 एनसीसी बटालियनचे जवान होते. कोसी नदीत पडल्यानंतर सोबतच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनसीसी व लष्करी जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मयुर यांचा मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आला. मयुर यांच्या निधनामुळे त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of Mayur Pandit in Jharkhand