रामशेज किल्ल्यावर तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नाशिक - नववर्षाच्या पहिल्या दिवशी मित्रांसमवेत रामशेज किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील मगन डंगारे (वय 29, शिवशक्ती चौक, सिडको) असे त्यांचे नाव आहे. सुनील डंगारे सकाळी मित्रांसमवेत रामशेज किल्ल्यावर फिरण्यासाठी गेल्यानंतर सव्वानऊच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशीच चक्कर येऊन कोसळला. त्याचे बंधू अनिल डंगारे यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Death of youth on Ramshej fort