हे आहेत आकडे..रस्ता अपघातात दहा महिन्यांत 'चक्क' इतके मृत्युमुखी 

road accident.jpg
road accident.jpg

नाशिक : नाशिक शहरहद्दीत गेल्या दहा महिन्यांत १३४ रस्ता अपघाताच्या घटना घडल्या. यात १३९ जणांचा हकनाक बळी गेला असून, यात ७८ दुचाकीस्वार आणि दहा चारचाकी चालकांचा समावेश आहे. विशेषतः यात ६७ दुचाकीस्वारांचा बळी हेल्मेट नसल्याने, तर दहा चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर न केल्याने गेला आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस शाखेकडून गुरुवारी (ता. १४) पासून बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

विनाहेल्मेटचे ६७ बळी, शहर वाहतूक शाखा राबविणार विशेष मोहीम 

रस्ता अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा यावी, यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. पण तरीही रस्ता अपघातांमध्ये घट होताना दिसत नाही, तसेच वाहनचालक नियमांचे पालन करण्यातही कुचराई करत असल्याने अपघाती बळींची संख्या वाढते आहे. गेल्या जानेवारी ते ऑक्‍टोबरअखेरपर्यंत नाशिक शहर परिसरात रस्ता अपघाताच्या १३४ घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये दुचाकीस्वार, चारचाकी चालक, सायकलस्वार आणि पादचारी अशांचा बळी गेला. जे चारचाकीचालक बळी गेले आहेत त्या दहाही चालकांनी सीटबेल्टचा वापर केला नसल्याचे पोलिस तपासातून समोर आले. 

बेशिस्त रिक्षाचालकांवर उगारणार बडगा 
शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी गुरुवार (ता. 14)पासून सकाळी व सायंकाळी दोन तासांची विशेष मोहीम पोलिस आयुक्त हद्दीतील तेरा पोलिस ठाण्यानिहाय राबविली जाईल. नाकाबंदी करत वाहनांची तपासणी, हेल्मेटसक्ती, सीटबेल्टची तपासणी केली जाणार आहे. तरी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालविण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. तसेच, बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

जानेवारी ते ऑक्‍टोबर अखेरपर्यंतची अपघाती बळींची आकडेवारी 
दुचाकीस्वार : 78 
विनाहेल्मेट : 67 
चारचाकीस्वार : 10 
विनासीटबेल्ट : 10 
पादचारी : 37 
सायकलस्वार : 4 
इतर : 10 
एकूण : 139  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com