लोकसहभागातून सुमारे १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

नाशिक - केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा  परिक्षांसाठी तयारी करणाऱ्या दिव्यांग, अनाथ, सर्व जाती धर्मातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ बहुद्देशिय संस्थेतर्गत मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, तसेच निवास, भोजन, अभ्यासिका व पुस्तकांच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ३० मे रोजी २० केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत.

नाशिक - केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा  परिक्षांसाठी तयारी करणाऱ्या दिव्यांग, अनाथ, सर्व जाती धर्मातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ बहुद्देशिय संस्थेतर्गत मनोबल, गुरुकुल, संजीवन प्रकल्पांतर्गत विनामूल्य प्रशिक्षण, तसेच निवास, भोजन, अभ्यासिका व पुस्तकांच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ३० मे रोजी २० केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत. सीमांत शेतकरी, शेतमजुरांची मुले, अनाथ मुले, आदिवासी विद्यार्थी तसेच अंध, अपंग, मूकबधीर अश्या सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असे प्रशिक्षण राबविणारी दीपस्तंभ ही प्रथम व एकमेव संस्था आहे. 

विविध संस्था, व्यक्ती, उद्योगांमधून देणगी उभारून वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व चांगला माणूस बनण्यासाठी घडविले जाते.

हा प्रकल्प महाराष्ट्रातील विचारवंतांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गौरविलेला असून, या प्रकल्पाअंतर्गत मागील 9 वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रकल्पातील 187 विद्यार्थी अधिकारी पदावर तर पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थी विविध पदांवर सध्या रुजू आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी इयत्ता आठवी स्कॉलरशिपचे गणित, इंग्रजी, बुद्धीमत्ता चाचणी, तर इयत्ता पाचवी ते दहावीचे विज्ञान, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे हे विषय अभ्यासक्रमात असतील. परीक्षेचा निकाल दि. 8 जून 2018 रोजी
www.deepstambhfoundation.org या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 12 ते 14 जून रोजी बोलविण्यात येईल. अंतिम निवड नंतर दीपस्तंभ मार्गदर्शन वर्गासाठी दीपस्तंभ प्रशिक्षण केंद्र जळगांव, धुळे, पुणे, नागपूर, पालघर, बारामती येथे होईल. 20 जून पासून प्रवेश देण्यात येणार आहेत.
       
परीक्षेसाठी नांव नोंदणी दिनांक 25 मे 2018 पर्यंत आहे तसेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन 7 मे पासून www.deepstambh.org या वेबसाईटवर करता येईल.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18005322242 येथे संपर्क साधावा. या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा यजुर्वेन्द्र महाजनयांनी केले आहे.

Web Title: Deepshabha Competitive Examination Scholarship Mahabhaiyan